उद्योजकाला फसविणाऱ्या चार व्यावसायिकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवत शहरातील उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार व्यावसायिकांना अहमदाबादेतून अटक झाली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी केली.

औरंगाबाद - गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवत शहरातील उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार व्यावसायिकांना अहमदाबादेतून अटक झाली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी केली.

चिंतन जितेंद्र आचार्य (वय 36, रा. अहमदाबाद), विषद अशोक जगासेठ (वय 48, रा. शाहीबाग), अल्केश डोनरराव दवे (वय 44, रा. नरोडा), जयराज हरिश्‍चंद्र पेडणेकर (रा. बापूनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. कुणाल विनयकुमार थिराणी (रा. सातारा) हे प्रिसीजन कम्पोनंट्‌स रिपिटीशन्स या कंपनीचे संचालक आहेत. वाळुज औद्योगिक वसाहतीत त्यांची कंपनी आहे. औरंगाबादमधील कुणाल थिराणी यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देऊ, असे आमिष या सर्वांनी दाखविले होते. यावर विश्‍वास ठेवत थिराणी यांनी गुंतणवूक केली, त्याचा परतावा व मूळ रक्कम देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक कोटी तीन लाख सत्तर हजार 233 रुपयांची गुंतवणूक केली. नियोजित काळात थिराणी यांनी मूळ रकमेसह परतावा मागितला. अमोल शेठ याने त्यांना धनादेश दिला; परंतु तो वटलाच नाही. थिराणी यांनी संचालक मंडळाकडे पैशांची मागणी केली; पण रक्कम व परतावा न मिळाल्याने कुणाल थिराणी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार नऊ जणांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Four professionals arrested