प्रकाशन चोरी करुन करुन चाळीस लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नांदेड : स्पर्धा परीक्षेच्या प्रकाशनाचे नाव बदलून आपल्या नावे पुस्तक तयार करुन ३० ते ४० लाखाची फसवणूक करणाऱ्या नांदेड येथील चार प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात औरंगाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

औरंगाबाद येथील प्राध्यापक कारभारी कौतीकराव भुत्तेकर यांचे नोबल पब्लिकेशन अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे पुस्तके बाजारपेठेत विक्रीस आहेत. त्या पुस्तकाचे खरेदीदार नांदेड येथेही आहेत.

नांदेड येथील नाईकनगर राहणाऱ्या काही जणांनी नोबलच्या एेवजी कॉपी करुन वर्षा पब्लिकेशनच्या नावे पुस्तके छापली. विशेष म्हणजे औरंगाबादसह मराठवाड्यात वर्षा पब्लिकेशन्सच्या नावे पुस्तके विक्री होत असल्याचे भुतेकर यांना समजले. यामुळे त्यांच्या व्यवसायात जवळपास ३० ते ४० लाख रुपयाचे नुकसान झाले.

त्याला नांदेडचे प्रकाशनच जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी औरंगाबाद शहर पोलिस चौकी ठाण्यात दिली. परंतु हा गुन्हा नांदेड येथे घडला असल्याने औरंगाबाद पोलिसांनी हा गुन्हा विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला. विमानतळ पोलिसांनी चौकशी करुन वर्षा पब्लिकेशन्स, ओम बुक सेंटर अॅन्ड एजन्सीज, प्राध्यापक व्ही. टी. बायस, प्राध्यापक श्रीमती देशमुख आणि प्राध्यापक स्वामी यांच्याविरूद्ध कॉपी राईट अॅक्ट  व फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शेख मुजीर हे करीत आहेत.

Web Title: Four professors booked for cheating and fraud in Nanded