औद्योगिक वसाहत लूट प्रकरण; चार दरोडेखोर जेरबंद 

उमेश वाघमारे
रविवार, 27 मे 2018

लुटीचे सहा लाख रुपयांसह एक दुचाकी, दोन खंजिर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक लता फड यांनी रविवारी (ता. 27) आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. 
 

जालना - शहरातील औद्योगिक वसाहत येथे गुरुवारी (ता. 24) भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या चार संशयित आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. 26) उशिरा अटक केली. त्यांच्याकडून लुटीचे सहा लाख रुपयांसह एक दुचाकी, दोन खंजिर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक लता फड यांनी रविवारी (ता. 27) आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. 

गीताई स्टील कंपनीचे मॅनेजर सनी गणेश चिलखा हे गुरुवारी (ता. 24) दुसऱ्या एका कंपनीतुन रोजच्या व्यवहारातील सहा लाख रुपये घेऊन आपल्या सहकार्यासह जात होते. यावेळी भरदिवसा दोन दुचाकीस्वार यांनी शस्त्रांचा धाक दाखवत पैशांची लूट करुण पसार झाले. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्यानंतर तपासाचे चक्र फिरवित पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या नेतृत्वाखाली तापसाचे तीन पथके तयार करण्यात आले. या तीन पथकाने चार  दरोडेखोना आरोपी हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद, जाफराबाद येथून अटक केली. यात मुख्य सूत्रधार कपिल उर्फ प्रकाश उर्फ पक्या सुंदरलाल जैन (वय 30), अर्जुन उर्फ धकी किशोर धाकतोडे (वय 23) आकाश राजुसिंग जुन्नी (ता.19, रा. म्हाडा कॉलनी टीव्ही सेंटर, जालना), किशोर भास्कर पडुळ (वय 24 रा. संतोष मातानगर, औरंगाबाद) यांना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलिस कर्मचारी भालचंद्र गिरी, कैलास कुरेवाड, सँम्यअल कांबळे, गोकुळसिंग कायट, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, समाधान तेलंगे, रंजीत वैराळ, विलास चेके, यांनी केली.

आधी दीडनंतर सहा लाख रुपये गेल्याची फिर्याद
गीताई स्टील कंपनीचे मॅनेजर सनी चिखल यांनी दोन संशयितांनी सुरवातीला दीड लाख लुटल्याचे फिर्यादित म्हटले. मात्र त्यानंतर दीड नाही तर सहा लाख रुपये लुटल्याचे सांगितले. आणि तपासादरम्यान या प्रकरणात दोन नाही तर चार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

गीताई स्टील कंपनीत कपील उर्फ प्रकाश उर्फ पक्या जैन काही दिवसांपूर्वी गाडिवर चालक म्हणून काम केले आहे. यापूर्वी ही त्याने दोन वेळा लूट करण्याचा डाव आखला होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Four Robbery theft arrested in Industrial Colony Robbery Case