औरंगाबाद : मृत्यूनेही त्यांना गाठले सोबतच, जालन्याचे चार तरुण अपघातात ठार

योगेश पायघन
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

  • शिर्डीला दर्शनासाठी होते जात
  • कार झाडाला धडकली
  • दोघे जखमी
  • गोलवाडी फाट्याजवळील घटना

औरंगाबाद - ते पाच जण घनिष्ट मित्र. सगळ्यांनी एकत्र येत शिर्डीला दर्शनसाठी जाण्याचे नियोजन केले. लागलीच किरायाने कार घेऊन ते रात्रीतून निघालेही. पण, नियतीच्या भांड्यात वेगळेच रसायन शिजत होते.  अचानक भरधाव कार  झाडावर आदळळी. यात चार जण ठार तर दोन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज (शनिवारी) पहाटे दोनच्या सुमारास औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ घडला. नेहमी सोबत असलेल्या जिवलग मित्रांना मृत्यूनेही सोबतच गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

चालक दत्ता डांगे (वय 30), अक्षय शीलवंत (वय 30) आकाश मोरे (वय 30) आणि अमोल गव्हाळकर (वय 22 सर्व रा शेवली ता. जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. संतोष राऊत (वय 17) आणि किरण गिरी (वय 16) हे जखमी झाले आहेत.

जालना तालुक्यातील शेवली येथील पाच महाविद्यालयीन तरुणांनी शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी किरायाने कार केली. चालकासह सहा जण कारमध्ये शेवलीहून शुक्रवारी रात्री नऊ वाजता शिर्डीकडे निघाले. जालन्याजवळ एका हॉटेलात जेवण करून ते मार्गस्थ झाले. काही जण कारमध्येच झोपी गेले. औरंगाबाद ओलांडून गोलवाडी फाट्याजवळून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली. त्यात चालकासह तिघांचा जागीच तर एकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस स्टेशनचे संजय वामने, आर. डी. वडगावकर, पी. एस. अडसूळ आणि कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी अपघातग्रस्तांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

उघडून तर पाहा -  मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण, वाचा

सकाळी चारच्या सुमारास चालक दत्ता डांगे, आकाश मोरे (वय 30) व अमोल गव्हाळकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अक्षय शीलवंत याचा ट्रॉमा केअरमध्ये उपचारादरम्यान सकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. जखमी संतोष राऊत व किरण गिरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Image may contain: car, tree and outdoor

संतोषने सांगितला थरार

या अपघातात संतोष किरकोळ तर किरण गंभीर जखमी आहे. यासंदर्भात जखमी संतोषला विचारले असता तो म्हणाला,  जेवण केल्यानंतर कारमध्येच मी झोपलेलो होतो. अपघात बेशुद्ध झालो. आता शुद्धीवर आलो तर दवाखान्यात असल्याचे कळले. दुसरा जखमी किरण याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

Image may contain: 1 person, standing, tree, outdoor and nature

अख्खा गाव शोकसागरात

गावातील चार उमद्या तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे अख्ख्या शेवली (ता. जालना) गाव शोकसागरात बुडाला आहे. गावात स्मशानशांतता असून, हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणाचा औरंगाबाद येथील छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

काय सांगता ? - एचआयव्हीच नव्हे तर शरीर संबंधातून होतात हे दहा गंभीर आजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Youths Killed in Accident at Golewadi Aurangabad