चौदा महिन्यांत 157 दृष्टिहीनांनी पाहिले जग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

औरंगाबाद - जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टिक्षीणता कार्यक्रमाअंतर्गत सात नेत्रपेढ्यांमधून 288 डोळ्यांचे बुबुळ संकलन करण्यात आले. त्यातून 157 दृष्टिहीन लोकांना जग पाहता येऊ शकले आहे. यातील दोन प्रत्यारोपण घाटीत पार पडले आहे. 

घाटीत एप्रिल 2017 पासून मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणाच्या 3098 शस्त्रक्रिया पार पडल्या, तर जिल्हा नेत्ररुग्णालयात मोतीबिंदूच्या 2024 शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नेत्रसमुपदेशक दत्ता बढे यांनी दिली. 

नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र यांचा स्मृतिदिन (10 जून) दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य शासन नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. एकट्या भारतात दीड कोटी लोक अंधत्वाचे शिकार आहेत. दृष्टी जाण्यासाठी मोतीबिंदू 58 टक्के, दृष्टिदोष 14 टक्के, काचबिंदू 2 टक्के, तर डोळ्यांचे आजार व विकार 26 टक्के कारणीभूत ठरतात, असे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले. 

मरणोत्तर नेत्रदानाचा कायदा असल्याने वयाच्या एक वर्षापासून कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन जणांना दृष्टी मिळते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक आनंदोत्सव हा नेत्रदानाच्या संकल्पाने केल्यास या कार्याला गती मिळेल, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या. 

शंभर शिबिरांचा संकल्प 
साईसूर्य नेत्रसेवा संस्थेने दृष्टिदान दिनानिमित्त राज्यभर 100 नेत्रशस्त्रक्रिया शिबिरांचा संकल्प केला आहे. त्यातील पहिले शिबिर शनिवारी (ता. नऊ) पार पडले. दृष्टिदोष निवारण करण्यासाठी विविध प्रकारच्या 16 शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. त्यातील लॅसिक ही पद्धत लोकप्रिय व परिणामकारक झाल्याने या पद्धतीच्या शस्त्रक्रिया जास्त होतात. सध्या टीव्ही, मोबाईलच्या युगात लहान मुलांनाही चष्मे लागायला लागले आहेत. वेळीच उपचार घेतल्यास 0.5 ते 40 नंबरपर्यंतचे चष्मे काढता येऊ शकतात, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली. 

Web Title: In the fourteen months 157 people with visions saw the world

टॅग्स