शेतकऱ्यांनी निवडला ठिय्या आंदोलनाचा मार्ग!

सयाजी शेळके
सोमवार, 22 जुलै 2019

-  जिल्ह्यातील शीला अतुल्या साखर कारखाने 2014 तसेच 2018 पासून अनेक शेतकऱ्यांचे उसाचे बिल अद्यापही दिलेले नाही.

- त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले.

उस्मानाबाद :  जिल्ह्यातील शीला अतुल्या साखर कारखाने 2014 तसेच 2018 पासून अनेक शेतकऱ्यांचे उसाचे बिल अद्यापही दिलेले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले.

म्हणजे सुमारे चाळीस शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. दुपारी एक वाजता सुरू झालेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. विशेष म्हणजे पाच वेळा कारखान्याच्या जमीनीचा लिलाव झाला मात्र त्या लिलावांमध्ये कोणीही सहभाग घेतला नाही. त्यामुळे जमीन विक्री होऊन शेतकऱ्यांना पैसे देता आलेले नाहीत. शेतकरी सातत्याने ऊस बिलाचे पैसे मिळावेत यासाठी मोर्चा, लाक्षणिक उपोषण असे मार्ग स्वीकारून आंदोलन केले.

मात्र तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अखेर सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या केबिन समोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे. जय लक्ष्मी शुगर ने 2014 मध्ये जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला. मात्र त्यांनाही अद्याप ऊस बिल मिळाले नाही. दुपारचे जेवणही ठिय्या मांडलेल्या ठिकाणीच शेतकऱ्यांनी सुरू केले.

त्यामुळे जोपर्यंत उस बिलाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Framers choose the way of agitation