मैत्रय कंपनीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 3 मे 2018

११ जणांविरुद्ध वजिराबाद ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​

नांदेड - पॉलिसीच्या नावाखाली दामदुपटीचे आमिष दाखवून नांदेडमधील मैत्रय कंपनीने अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. मैत्रय कंपनीतील अनेकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २००९ सालापासून सुरू होता. 

मैत्रय कंपनीच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखविले. यासाठी शहरासह ग्रामिण भागातही मैत्रय नावाच्या कंपनीने आपल्या दलालांमार्फत पाय पसरले होते. अनेकांना दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून लाखों रुपयाची माया या कंपनीने जमविली. परंतु, या गुंतवणूकदारांची या कंपनीकडून फसवणूक झाली. मागील दोन वर्षापासून ही कंपनी बंद पडली असल्याने यात अनेक गुंतवणूकदारांना फटका बसला आहे.

मैत्रय कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे यासाठी गुंतवणूकदार मिनाक्षी चांदु कांबळे व त्यांच्या काही साथीदारांनी नांदेड न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशावरून वजिराबाद पोलिस ठाण्यात वर्षा सपकाळ, शोभा ढगे, गौत्तम बुक्तरे, तातेराव काशिदे, प्रशांत बोराडे, संभाजी ढगे, शिवकैलास कुंटूरकर, रमेश बहात्तरे, प्रभु पुंडगे, रजनी मेडपल्लेवार आणि श्री. पांडे यांच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ नाईकवाडे हे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: fraud by maitray company