दोन कोटींच्या डाळीची परस्पर विक्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

लातूर : दोन कोटी रुपयांची डाळ परस्पर विकल्याप्रकरणी हरंगुळ येथील किसान वेअर हाउसच्या चालकावर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

व्यापारी अतिश सुग्रीव जाधव यांनी 11 ऑगस्ट 2012 ते 11 डिसेंबर 2015 या कालावधीत एक कोटी 96 लाख 92 हजार 500 रुपयांची एक हजार 116 क्विंटल तूरडाळ व 13 लाख 86 हजार रुपयांची शंभर क्विंटल तूर असा एकूण दोन कोटी 10 लाख 78 हजार 500 रुपयांचे धान्य त्यांनी माल किसान वेअर हाउसमध्ये ठेवले होते; पण ते त्यांना परत मिळाले नाही.

डाळीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार अतिश जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड यांनी चौकशी केली. त्यातून रविवारी (ता. 23) वेअर हाउस चालक हेमंत वैद्य यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

Web Title: Fraud in Pulses trade at Latur