चक्क 17 वर्षांचा पोरगा झाला शिक्षक, संस्था चालकाची कमाल

Fraud in teacher recruitment at Aurangabad
Fraud in teacher recruitment at Aurangabad

औरंगाबाद - बेरीबाग भागातील अल मदनी उर्दू प्राथमिक शाळेत चक्क एका 17 वर्षीय तरुणाला शिक्षकाची नोकरी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी संस्थेचा सचिव शेख अयुब उस्मान पटेल (वय 48), अध्यक्ष शेख अलिया अयुब पटेल (42), मुख्याध्यापक शेख नाजिया अंजुम शेख बद्रोद्दिन (29) आणि शिक्षक शेख मोहसीन अयुब पटेल (21, सर्व रा. बेरीबाग, हर्सूल) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल मदनी उर्दू प्राथमिक शाळेत शफिक बाबूलाल सय्यद (36, रा. जटवाडा रोड) यांची पत्नी पठाण परवीन सुलताना या पदवीधर शिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. या शाळेने सतरावर्षीय तरुणाला शिक्षकाची नोकरी दिल्याची माहिती पठाण परवीन यांना मिळाली. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापिकेने त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. याच काळात शेख मोहसीन हा डी.एड.चे शिक्षण घेत होता. त्याचे शिक्षण पूर्ण झालेले नसताना त्याला शिक्षक पदावर रुजू करण्यात आले. यावेळी त्याची बनावट कागदपत्रे शासनाला सादर करण्यात आली.

या प्रकरणी शफिक सय्यद यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी (ता. 18 ऑक्‍टोबर) चौघांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक कामे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com