इंटरनेटबंदीने कुटुंबांमध्ये मुक्त संवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - शहरात दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने इंटरनेट बंद केले. त्यामुळे सोशल मीडियाने वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या अफवा थांबल्या आणि दंगलीवर नियंत्रण आले. असे असले तरीही इंटरनेट बंद असल्याने काहींचे मोठे नुकसान झाले, तर अनेकांनी प्रचंड शांतता अनुभवत कुटुंबीयांना वेळ दिला. 

औरंगाबाद - शहरात दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने इंटरनेट बंद केले. त्यामुळे सोशल मीडियाने वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या अफवा थांबल्या आणि दंगलीवर नियंत्रण आले. असे असले तरीही इंटरनेट बंद असल्याने काहींचे मोठे नुकसान झाले, तर अनेकांनी प्रचंड शांतता अनुभवत कुटुंबीयांना वेळ दिला. 

काय झाले परिणाम? 
इंटरनेट बंद असल्याने मोबाईलवरील व्हॉट्‌सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारखा सर्व सोशल मीडियाला कुलूप लागले. सोशल मीडिया बंद पडल्याने नागरिकांनी शांतता अनुभवली. एरव्ही कुटुंबातील कमी झालेला संवाद फुलून आला. घराघरांत लोकांनी एकत्रित भोजन, गप्पागोष्टींचा आनंद लुटला. रोज विनाकारण हजार-पाचशे व्हॉट्‌सॲप मॅसेज वाचून डिलीट करण्यात मोठा वेळ जात होता. या सवयीला नियंत्रित करण्यासाठी मदत झाली, अशी प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली. 

सोशल मीडियामुळे लोकांचा वेळ तर वाया जातोच; मात्र मनोविकारांची संख्या वाढत आहे. अतिवापराने मनावर ताण येऊन विविध आजारांचा सामना करावा लागतो. इंटरनेटच्या वापराबद्दल शासनानेच दिवसभराचे काही तास ठरवून दिले पाहिजे. 
-गंगाप्रसाद खरात 

इंटरनेट बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. काही विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करून परीक्षा देत असतात. त्यांचे मोठे नुकसान होत आहे. घटनेच्या अनुषंगाने इंटरनेट बंद केले हे ठीक; पण इंटरनेट आता जीवनाचा भाग झाला आहे. 
- विनोद राठी 

शहरातील इंटरनेट सेवा बंद असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. ईमेल आणि व्हॉट्‌सॲप बंद झाल्याने माहितीची देवाणघेवाण थांबली आहे. आजच्या धकाधकीच्या काळात इंटरनेट अत्यावश्‍यक झाले आहे. इंटरनेट सेवा बंद पडल्याने अनेक कामे खोळंबल्याने मोठा मनस्ताप झाला आहे. 
-राजेश पतंगे 

इंटरनेट सेवा बंद झाल्याने काहीही अडचण आली नाही. रिकामा व्हॉट्‌सॲपमध्ये जाणारा वेळ वाचला आणि इंटरनेट बंद असल्याने कुटुंबामध्ये एकत्रित गप्पाटप्पांनाही वेळ मिळाल्याचा आनंद आहे. खरे तर आणखी चारआठ दिवस ही सेवा बंद राहिली तरीही काहीही फरक पडणार नाही. 
-विनोद तंगे 

Web Title: Free communication between families with Internet restrictions