‘या’ शासकिय रुग्णालयात मोफत अन्नदान

फोटो
फोटो

नांदेड : लाॅयन्स क्लब नांदेड मीडटाउनच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात साईप्रसाद अन्न वाटप केंद्रावर दररोज गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना कै. चंद्रभागाबाई आणि कै. नागनाथराव गीते यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लॉयन्स सदस्य शिरीष गीते व मानवेंद्र गीते यांनी लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्या" फीड द हंगर " या प्रकल्पाअंतर्गत रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना माजी प्रांतपाल प्रवीण अग्रवाल, अध्यक्ष योगेश जायसवाल, सचिव अमरसिंह चौहान, छायाचित्रकार विजय होकर्णे, रवी कासलीवाल यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. 

अनेकांनी यात सहभागी व्हावे

रुग्णालय परिसरातील दोनशेहून अधिक गरजूनी या अन्नदानाचा लाभ घेतला. यावेळी प्रवीण अग्रवाल यांनी साईप्रसाद या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सदस्यांचे अभिनंदन करून जास्तीत जास्त सदस्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी या प्रसंगाच्या अनुषंगाने रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची निकडीची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त सदस्यांनी सहभाग घ्यावा व साईप्रसाद संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेला उपक्रम दैनंदिन व सातत्याने सुरु राहण्यास मदत होईल. याचा प्रयत्न करावा असे म्हंटले. याप्रसंगी अनिता गीते, उमा कुटे, कुसुम मुंडे, यांनीही अन्नदान वाटपात मदत केली. 

महावितरणकडून शिवजन्मोत्सवाचे आयोजन

नांदेड : महावितरण व महापारेषण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. 

बुधवारी (ता. १९) सकाळी १० वाजता शिवचरीत्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 
विद्युतभवन परिमंडळ कार्यालय आण्णाभाऊ साठे चौक येथील कार्यालयाच्या प्रांगणात महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिवजन्मोत्सवात प्रख्यात बाल शिवव्याख्याती भाग्यश्री मोहितेचे शिवचरित्रावरील व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. 

प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार

याप्रसंगी नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे तसेच पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण नाईक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व कार्यकारी अभियंता व महापारेषणचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकुटूंब उपस्थित राहून शिवजन्मोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवजन्मोत्सव संयुक्त समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com