esakal | स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव नाडे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीराव नाडे

स्वातंत्र्यानंतर त्यांनी बीडचे तत्कालीन खासदार बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मुरूड परिसरात ग्रामविकासाला सुरवात केली. ग्रामविकासाच्या अनेक योजनांची सुरूवात त्यांच्या पुढाकाराने झाली. यातूनच खादी ग्रामोद्योगातून विणकाम, हातकाम, तेलघाना, सुतकताई आदी उद्योग सुरू झाले.

स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव नाडे यांचे निधन

sakal_logo
By
विकास गाढवे

मुरूड (जि. लातूर) : येथील सहकारमहर्षी व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे (Freedom Fighter Shivajirao Nade) उर्फ काकासाहेब (वय ९६) यांचे शुक्रवारी (ता. ११) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (ता.१२) सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जुन्या उस्मानाबाद (Osmanabad) (लातूर व उस्मानाबाद एकत्र) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे व ढोकीच्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे (Latur) उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. मुरूड ग्रामपंचायतीचे ते तब्बल ३८ वर्ष बिनविरोध सरपंच होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात (Hyderabad Freedom Struggle) सहभाग घेतला. निझामाच्या विरोधात सशस्त्र लढा दिला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी बीडचे (Beed) तत्कालीन खासदार बाबासाहेब परांजपे (MP Babasaheb Paranjape) यांच्या नेतृत्वाखाली मुरूड परिसरात ग्रामविकासाला सुरवात केली. ग्रामविकासाच्या अनेक योजनांची सुरूवात त्यांच्या पुढाकाराने झाली. यातूनच खादी ग्रामोद्योगातून विणकाम, हातकाम, तेलघाना, सुतकताई आदी उद्योग सुरू झाले. (Freedom Fighter Shivajirao Nade Passed Away In Murud)

हेही वाचा: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरून चिंता

१९५२ मध्ये त्यांनी येथे रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. जिल्हा मार्केटींग संस्थेचे ते अध्यक्ष होते. ढोकीच्या तेरणा साखर कारखाना, लातूरची जिल्हा बँकेची सातमजली इमारत व आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील डालडा फॅक्टरीच्या ( को - ऑपरेटिव्ह ऑईल इंडस्ट्रीज) स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दूरसंचार, वीज, रेल्वे, वृक्ष लागवड, फेरभरण आदी क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय काम आहे. तत्कालीन वीज मंडळाचे ते काही काळ सदस्य होते. १९८० मध्ये लातूर विधानसभा निवडणुकीत ते एस. (शरद पवार) कॉंग्रेसचे उमेदवार होते. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.