एकेकाळचा पार्टनरच निघाला मास्टर माईंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

लातूर : येथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण
यांच्यावर गोळी झाडून खून केल्या प्रकरणाचा तपास उघडकीस आणण्यात पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना यश आले आहे. या प्रकरणात चव्हाण यांचा एके काळचा पार्टनर प्रा. चंदनकुमार शर्मा हा मास्टर माईंड असून 20 लाखाची सुपारी देऊन त्याने हा खून घडवून आणला आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रा. चंदनकुमार शर्मा याच्यासह  पाच जणांना अटक केली आहे.

दरम्यान चव्हाण यांच्यावर मंगळवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांचा सोमवारी रात्री 12.30च्या
सुमारास शिवाजी विद्यालयाच्या परिसरात गोळी झाडून खून झाला होता.
त्यानंतर डॉ. राठोड यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून या प्रकरणातील
मास्टर माईंड प्रा. चंदनकुमार शर्मा याच्यासह पाच जणांना अटक केली आहे.
चव्हाण व प्रा. शर्मा यांनी काही वर्षापूर्वी एकत्र येवून येथे क्लासेस
सुरु केले होते. आर्थिक कारणावरून ते बाजूला झाले होते. यात चव्हाण
आपल्याला मारणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर प्रा. शर्मा यानेच चव्हाण याचा वीस लाखाची सुपारी देवून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. यात पोलिसांनी गोळी झाडलेली पिस्तुल, काही काडतुसे व अडीच लाख रुपयेही जप्त केले आहेत.

Web Title: friends become master mind in murder

टॅग्स