मैत्रिणीचा वाढदिवस पडला महागात ; हाणामारीत फोडले मित्राचे नाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कैलासनगर भागातील मयुर अपार्टमेंटमध्ये राहणारा शुभम व्यकंटराव जाधव (वय २२) हा आपल्या मैत्रीणीचा वाढदिवस विसावा उद्यानात करण्यासाठी आला.

नांदेड : फ्रेंडशिपडेच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्राला मारहाण झाली. यात त्याच्या नाकाचे हाड मोडले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. वाढदिवस साजरा करणे त्याला चांगलेच महागात पडले. 

कैलासनगर भागातील मयुर अपार्टमेंटमध्ये राहणारा शुभम व्यकंटराव जाधव (वय २२) हा आपल्या मैत्रीणीचा वाढदिवस विसावा उद्यानात करण्यासाठी आला. उद्यानात रविवारी (ता. पाच) आपल्या अन्य काही मित्रांसोबत केक कापून उत्साह साजरा करीत होता. यावेळी केकचा एक तुकडा उडाला आणि बाजूला बसलेल्या बिलालखान रा. मंडई, नांदेड याच्या अंगावर पडला. यावेळी त्याने त्याच्यासोबत वाद घातला.

मित्रांनी संगनमत करून शुभम याला मारहाण केली यात त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. यात त्याच्या नाकाचे हाड मोडले. उपचार घेऊन आल्यानंतर त्याने शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी बिलालखान आणि त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत. 

Web Title: friends birthday clashes happened The nose of the crushed man