मैत्री जपली, "मध्य'मधून तनवाणींची माघार

प्रदीप जैस्वाल , किशनचंद तनवाणी
प्रदीप जैस्वाल , किशनचंद तनवाणी

औरंगाबाद : एकमेकांचे मित्र असलेले मध्य मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अखेरच्या क्षणी मैत्री जपत श्री. तनवाणी यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे प्रदीप जैस्वाल यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. 


गेल्या निवडणुकीत 2014 मध्ये युती तुटल्याने मध्य विधानसभा मतदारसंघात जैस्वाल-तनवाणी यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढविली होती. यामुळे मतविभाजनाचा फटका बसल्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला आणि औरंगाबादेत "एमआयएम'चा उदय झाला होता. 2014 ची पुनरावृत्ती यावेळी नको म्हणून तनवाणी यांनी पुकारलेले बंड शमविण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटच्या दिवशी दुपारी दोन-अडीचपर्यंत श्री. तनवाणी त्यांच्या कार्यालयात बसून होते. शेवटी महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी स्वत: पुढाकार घेत त्यांचे संपर्क कार्यालय गाठले. तिथे या दोन मित्रांमध्ये चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांशी फोनाफोनी झाली.

मध्यममार्ग निघाल्यानंतर दोघेही एकाच वाहनात बसून थेट शासकीय तंत्रनिकेतन येथील निवडणूक कार्यालयात दाखल झाले. सोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, गजानन बारवाल, राजगौरव वानखेडे, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, चिंतन शहा, धीरज पवार, भावेश सराफ, गोपी घोडेले, रविकांत गवळी होते. श्री. तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन बाहेर आल्यानंतर दोघांनी माध्यमांसमोर गळाभेट घेतली. 

 
म्हणून घेतली माघार 

गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती, याचा शहराला त्रास झाला होता. यावेळी महायुती आहे. माझे मित्र प्रदीप जैस्वाल महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मीही अर्ज भरला होता; मात्र आता 2014 ची पुनरावृत्ती नको. या शहराला हिंदू आमदार मिळाला पाहिजे, यासाठी मी माघार घेतली आहे. त्यांना जास्तीत जास्त मते कशी मिळतील, यासाठी आम्ही सर्वजण दिवसरात्र मेहनत घेऊ.

किशनचंद तनवाणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com