निखळ मैत्रीला संशयाची किनार

मनोज साखरे
बुधवार, 9 मे 2018

औरंगाबाद - मित्र आणि मैत्रिणीत भेद का केला जातो, एखाद्या मुलासोबत मैत्री केली तर ती मुलगी बिघडली असा अर्थ होत नाही. मुलांसोबत मुलींनी मैत्री करू नये का? असे प्रश्‍न समाजासमोर ठेवून अठरावर्षीय पायल गायकवाडने गळफास घेऊन सोमवारी (ता. सात) आत्महत्या केली. तिची एक्‍झिट चटका लावणारी ठरली. निखळ मैत्री मुला-मुलींत असू शकत नाही का? मग समाजाकडून संशयी वृत्तीने का बघितले जाते, अशा बाबी समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.  

चार वर्षांपूर्वी पायलच्या आईनेही आत्महत्या केली होती. त्यानंतर आता मुलीने आत्महत्या केली. आई-वडील व कॅंटीन कट्टा अर्थात मित्र-मैत्रिणी हेच या मुलीचे विश्‍व होते. मुलांसोबतची मैत्री आजही समाजाला मान्य आहेच असे नाही.

त्यामुळेच ‘‘काही लोकांची वृत्ती कधीच बदलत नाही. नाव खराब होईल असे काम मी कधीच केले नाही.’’ अशा भावना तिने चिठ्ठीतून व्यक्त केल्या. आपली निरागसता व्यक्त करण्याची वेळ मुलीवर आली. मुळात प्रश्‍न असा, की स्वच्छंद आणि मुक्त जगलं, की लोक नको ते आरोप करतात. वयाचे भान नाही, मोठे झाल्या तरीही जाणिवा नाही असे सांगून मुलींच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला जातो. मग मुलांसोबतची मैत्री तर दूरच. विशेषत: समाजाला मुलांसोबतची मैत्री सलते. पायलच्या भावना अशा अनेक तरुणींचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते.

यावर विचार करण्याची वेळ
  मुलासोबत मुलीच्या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून का पाहिले जाते.
  मुक्त आणि स्वछंद जगल्यास ‘तो’ किंवा ‘ती’ बिघडलीच म्हणायचे का?
  संकुचित व संशयीवृत्ती बदलणार तरी केव्हा?
  कुटुंबासोबतच मित्र-मैत्रीणही आयुष्याचा भाग नाही का?

Web Title: Friendship Payal gakwad Suicide