उदगीरच्या कोरोना योद्ध्यांनी घेतले सातशे व्यक्तींचे स्वॅब, सलाम त्यांच्या कामाला

उदगीरच्या कोरोना योद्ध्यांनी घेतले सातशे व्यक्तींचे स्वॅब, सलाम त्यांच्या कामाला

उदगीरच्या कोरोना योद्ध्यांनी घेतले सातशे व्यक्तींचे स्वॅब
--
तीन डॉक्टर, तीन सहायकांचे कार्य जिल्ह्यासाठी प्रेरणादायी
--
युवराज धोतरे
---
उदगीर, ता.२८ : शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत येथील शासकीय रुग्णालयातील तीन डॉक्टर, तीन सहायकांचे कार्य जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. या दोन महिन्यांत या डॉक्टरांच्या चमूने तब्बल सातशे जणांचे शोध घेण्याचे काम केले आहे.
समोर आलेला रुग्ण हा संशयित असताना त्यास कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही हे माहीत नसतानाही त्याचा स्वॅब घेणे हे फार आव्हानात्मक काम आहे. जगामध्ये अनेक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे उदाहरण समोर असतानाही न डगमगता रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत अनेक वेळा या कोरोना युद्धात लढा देणाऱ्या या चमूने केलेले कार्य हे जिल्ह्यासाठी प्रेरणादायी व आव्हानात्मक ठरणारे आहे. उदगीरच्या कोरोना रुग्णालयात लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक सातशे स्वॅब घेण्यात आले आहेत. या रुग्णालयातील डॉ. महेश वाघमारे, डॉ.ज्योत्स्ना डावरे-माने, डॉ.संगीता सोंदळे-मोकळे, सहायक राजीव गायकवाड, नर्सिंग पांचाळ, शंकर बिरादार या चमूकडे स्वॅब घेण्याची जबाबदारी आहे. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सातत्याने हा चमू स्वॅब घेण्याचे काम करत आहे.
या चमूने उदगीरच्या कोरोना रुग्णालयात आजपर्यंत नऊ महिन्यांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या वृद्धापर्यंतचे स्वॅब घेतले आहेत. शिवाय अनेक मृतदेहाचे सुद्धा स्वॅब या चमूने घेतले आहेत. कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणे याहीपेक्षा त्यांच्या थेट नाका, तोंडातील स्वॅब घेणे हे किती आव्हानात्मक काम आहे, याची कल्पना सुद्धा न केलेली बरी. या कोरोना लढ्यातील या चमूचे काम समाजासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. हा स्वॅब घेत असताना अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. रुग्णाला कोणतीही इजा न होता घ्यावा लागतो. या चमूच्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणाचीही तक्रार नाही. वेळेचेही बंधन न पाहता घ्यावा लागतो. या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये या चमूचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. या हॉस्पिटल अतिशय उत्कृष्ट कार्य करणारी चमू ठरला असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीश हरिदास व कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.
--
क्वारंटाइन केंद्रामधूनही घेतले स्वॅब
--
अनेक वेळा सोमनाथपूर (ता.उदगीर) येथील शासकीय वसतिगृह व तोंडार पाटी (ता.उदगीर) येथील क्वारंटाइन केंद्रात जाऊन तेथील संशयित रुग्णांचे स्वॅब या चमूने घेतले आहेत. सुरक्षा किट परिधान करून या डॉक्टरांचे कार्य हे जिल्ह्यात प्रेरणादायी ठरले आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com