सावधान, फळांमध्ये ‘केमिकल लोचा!’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

औरंगाबाद - तापमापकाने चाळिशी पार केली तशी फळांच्या बाजारात उलाढाल वाढली; मात्र कमी काळात अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी काही व्यापारी घातक रसायनाचा वापर करून फळांना कृत्रिमरीत्या पिकवत आहेत. परिणामी, ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत रसदार फळांची मागणी वाढते. हेच हेरून नफा कमविण्यासाठी काही व्यापारी आणि उत्पादकसुद्धा अपरिपक्व फळांना रसायनाद्वारे पिकवतात. अशी फळे आरोग्यासाठी घातक आहेत; मात्र शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून हा ‘केमिकल लोचा’ करणाऱ्यांवर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.

असे ओळखा
  आंबा - कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईटचा वापर केला जातो. असा आंबा हातात घेऊन दाबल्यास नरम लागतो. तो दिसायला पिवळाधमक, साल गुळगुळीत असते. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याला एक विशिष्ट सुगंध असतो.
  टरबूज - स्टेरॉईट इंजेक्‍शनचा वापर करून पिकवलेल्या टरबुजांमध्ये तंतूचे जाळे भरीव न राहता तुटक-तुटक असते.
  सफरचंद - मेण किंवा तेल लावून चमकवले जाते. नैसर्गिकरीत्या पिकलेले सफरचंद असे चमकत नाही.
  द्राक्ष - नैसर्गिक पिकलेल्या द्राक्षाला कुठलाही सुगंध नसतो.
  हंगाम नसताना बाजारात जरी पिकलेली फळे दिसली तर खात्री करूनच खरेदी करा. ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असू शकतात.

एका दिवसात पिकवतात आंबा
झाडाला आंबा लागल्यापासून ते तो पिकेपर्यंत १३० ते १४० दिवस लागतात; पण काही व्यापारी कमी भावात कैऱ्या घेऊन एका दिवसात पिकवतात. त्यासाठी चुनखडीसारख्या दिसणाऱ्या कॅल्शियम कार्बाईटची पूड कैरीच्या क्रेटमध्ये ठेवतात. अवघ्या २४ तासांतच रासायनिक प्रक्रिया होऊन कैरीचे रूपांतर पिवळ्याधमक आंब्यात होते.

मी टरबूज व अननस खरेदी केले. घरी आल्यानंतर ही दोन्ही फळे रासायनिक पद्धतीने पिकवलेले आणि  खराब असल्याचे कळले. बाजारात जाऊन त्या फळ विक्रेतांचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. यामुळे दीडशे रुपयांचे नुकसान झाले.
- कमलबाई पाटील.

Web Title: fruit chemical alert health care