फरार मुख्याधिकारी बी.सी. गावितला अटक; माजलगाव नगर परिषदेतील साडेपाच कोटीचे भ्रष्टाचार प्रकरण

Fugitive Chief Officer B.C. Gavit has been arrested
Fugitive Chief Officer B.C. Gavit has been arrested

माजलगाव (बीड) : माजलगाव नगर परिषदेत पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी असलेले मुख्याधिकारी बी.सी. गावित यांना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लागारे यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ३६) पहाटे एक वाजता नंदुरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा येथील राहत्या घरून ही अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून  त्यांची कसून चौकशी सुरू असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आष्टी पोलिसांनी सांगितले.

माजलगाव नगर परिषद विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत झालेल्या एक कोटी ६१ लाख तसेच चार कोटी १३ लाख रुपये असे एकूण पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तत्कालीन नगराध्यक्ष, तीन मुख्याधिकारी, लेखापाल यांच्यासह सात जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास अष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लागारे हे करीत आहेत. यातील आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी. गावित हे मागील १४ महिन्यापासून पोलिसांना चकमा देत फरारी होते. 

मागील काही दिवसांपासून गावित हे आपल्या गावी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक धरनिधर कोळेकर, पोलिस नाईक विकास राठोड, रामनाथ शिनगारे हे मागील चार दिवसापासून नंदुरबार येथे तळ ठोकून होते. मुख्याधिकारी गावित हे शुक्रवारी (ता. २६) पहाटे एक वाजता कुंभारपाडा (जिल्हा नंदुरबार) येथील त्यांच्या घरी आले असता या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन आष्टी पोलिस ठाण्यात आणले. दिवसभर आष्टी पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू असून शनिवारी गावित यांना माजलगाव न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com