संगणकीकरणामुळे ‘मार्च एंडिंग’ सुलभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

फुलंब्री - एप्रिल महिन्यापासून नवे आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने, पंधरा दिवसांपासूनच शासकीय, निमशासकीय कार्यालये, बॅंका, पतसंस्थांमध्ये ‘मार्च एंडिंग’ची तयारी दिसून आली. हिशेबाची जुळवाजुळव करणे कालबाह्य होत असून, बहुतांश विभाग संगणकाच्या साहाय्याने ऑनलाइन अपडेट राहत असल्याने मार्च एंडिंगची डोकेदुखी कमी झाली आहे. बॅंकांमुळे ज्या त्या दिवशीच्या ठेवी, कर्ज, थकबाकी, नफा व व्याज निघत असल्याने मार्च एंडिंग करणे सोपे झाले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरी सहकारी संस्था, बाजार समिती, बॅंका, पतसंस्था, शासकीय कार्यालयांच्या विविध विभागांना ३१ मार्चपूर्वी निधीचा विनियोग सादर करावा लागतो. बहुतांश ठिकाणी संगणकीकरण झाल्याने सेवा सुलभ झाल्या आहेत. शुक्रवारी, शनिवारी सलग दोन दिवस सुट्या आल्या. त्यातच शनिवार हा मार्चअखेरचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शनिवारी बहुतांश बॅंक व्यवहार बंद ठेवून मार्च एंडिंगची तयारी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी रविवार येत असल्याने त्या दिवशीही बॅंकेचे व्यवहार बंदच राहणार आहेत. सलग चार दिवस बॅंकेत नागरिकांना व्यवहार करता येणार नसल्याने सोमवारी (ता. दोन) सर्वच बॅंकांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. बॅंकांचे व्यवहार व शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कामकाजही सोमवारपासून पूर्ववत होणार आहे. बॅंकिंग स्टेटमेंटमुळे मार्चअखेरची कामे झपाट्याने करता आली. ऑनलाइन प्रणालीमुळे बॅंकेची ३१ मार्चअखेर करावी लागणारी कामे पूर्ण होण्यास मदत झाली.

कोअर बॅंकिंग प्रणालीने मार्च एंडिंगसाठी लागणारे स्टेटमेंट तत्काळ मिळले. बॅंकेत दररोज होणाऱ्या व्यवहाराचे ताळेबंद त्याच दिवशी अपडेट होतात. त्यामुळे दिवसाला आणि महिन्याला किती कर्जवाटप झाले, ठेवी, वसुली, थकबाकी, नफा यांची तपशीलवार माहिती तत्काळ मिळाली.

आकड्यांची जुळवाजुळव 
मार्च एंडअखेर ताळेबंद करण्यासाठी निधी अखर्चित राहू नये, परत जाऊ नये, यासाठी शासकीय विभागाला कमालीची कसरत करावी लागली. पूर्ण झालेल्या शासकीय योजनांची बिले काढणे, नवीन कामाचे नियोजन, शिल्लक राहणारा निधी यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत विचारविनिमय होत होता. त्यानुसारच आर्थिक ताळेबंदाची जुळवणी सुरू होती.

Web Title: fulambri marathwada news computerised march ending