फुलंब्रीतील आरोग्य केंद्रे राज्यात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

फुलंब्री - तालुक्‍यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे असून पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राला आयएसओ मानांकन मिळालेले आहे. राज्यात गणोरीचे प्रथमिक आरोग्य केंद्र प्रथम, तर आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गुणवत्तेच्या बाबतीत नियमित सातत्य ठेवल्याने द्वितीय आले असल्याची माहिती औरंगाबाद विभाग आरोग्य परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. विलास विखे पाटील यांनी बुधवारी (ता. दहा) ‘सकाळ’ला दिली. केंद्रीय पथकाच्या गुणवत्तेत गणोरीच्या केंद्राला ९१.३२% गुण, तर आळंद केंद्राला ८९.६८ गुण मिळाले आहे.

फुलंब्री - तालुक्‍यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे असून पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राला आयएसओ मानांकन मिळालेले आहे. राज्यात गणोरीचे प्रथमिक आरोग्य केंद्र प्रथम, तर आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गुणवत्तेच्या बाबतीत नियमित सातत्य ठेवल्याने द्वितीय आले असल्याची माहिती औरंगाबाद विभाग आरोग्य परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. विलास विखे पाटील यांनी बुधवारी (ता. दहा) ‘सकाळ’ला दिली. केंद्रीय पथकाच्या गुणवत्तेत गणोरीच्या केंद्राला ९१.३२% गुण, तर आळंद केंद्राला ८९.६८ गुण मिळाले आहे. या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यात नाव कोरल्याने इतर आरोग्य केंद्रांसमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

एकाच तालुक्‍यातील दोन आरोग्य केंद्राने राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या केंद्रीय पथकाच्या पाहणीत राज्यात अव्वल स्थान मिळाल्यामुळे तालुक्‍याचे नावलौकिक होऊन राज्यात मानाचा तुरा रोवला आहे.

तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे आरोग्य केंद्रातून दर्जेदार आरोग्याची सेवा रुग्णांना मिळत आहे. स्वच्छ, सुंदर व सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र बनविल्याने या आरोग्य केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त झालेले आहे.

तसेच यापूर्वीदेखील गणोरी येथील आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, कायाकल्प पुरस्कार, तर आळंद येथील केंद्राला कायाकल्प पुरस्कार देण्यात आला आहे.

Web Title: fulambri news fulambri health center topper