फुलंब्री पाणीदार बनविण्यासाठी एकवटले हजारो हात

नवनाथ इधाटे पाटील
सोमवार, 16 एप्रिल 2018

फुलंब्री - तालुक्यातील निधोना येथील ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कंबर कसली आहे. आपले गाव पाणीदार करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेऊन लोकसहभागातून नदी, नाला खोलीकरण कामाला सुरुवात केली. गेल्या तीन-चार महिन्यात सुमारे वीस किलोमीटर लांबीचे काम पूर्णही झाले आहे. 

फुलंब्री - तालुक्यातील निधोना येथील ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कंबर कसली आहे. आपले गाव पाणीदार करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेऊन लोकसहभागातून नदी, नाला खोलीकरण कामाला सुरुवात केली. गेल्या तीन-चार महिन्यात सुमारे वीस किलोमीटर लांबीचे काम पूर्णही झाले आहे. 

फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेल्या निधोना गावाची लोकसंख्या 3308 आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्र 12 हजार हेक्टर आहे. यातील 80 टक्के जमीन जिरायत तर केवळ 20 टक्केच जमीन हंगामी बागायत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्याना शेती करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकच्या पाझर तलावात पाणीसाठा झालाच नाही. विहिरींचे पाणी आटले. परिणामी गेल्या चार महिन्यांपासून गावातीन नागरिकांना टँकरने पिण्याचे पाणी दिले जात आहे. 

गावात कामासाठी लागणाऱ्या मशीनरीला लागणारे इंधन लोकवर्गणी करून करण्यात येत आहे. गावातील काही जण जे बाहेरगावी नोकरीला आहेत. अशांनी देखील गावात पाणी यावे यासाठी आर्थिक मदत केली. आतापर्यंत सुमारे 12 लाखाचा खर्च हा इंधनावर झाला आहे. गाव परिसरातील नद्या, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यानंतर गावाने वॉटरकप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

ग्रामस्थांनी केली प्रतिज्ञा
गाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर येणाऱ्या  काळात पाणी साठवण करता येईल व त्यामुळे पाणीटंचाई निवारणास मदत होईल. असा विचार करून ग्रामस्थ 26 डिसेंबर रोजी स्थानिक राजकीय हेवेदावे, गटतट विसरून एकत्र आले. लोकांनी एकजूट करून आपल्या गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला व लोकसहभागातून जलसंधारणची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. गेल्या तीन-चार महिन्यांपासून जेसीबीने रात्रंदिवस काम सुरु आहे. यात आतापर्यंत सुमारे वीस कि.मी. लांबीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. 

श्रमदानातुन उभारला दगडी बांध
गावातील नदी नाल्यांचे करण्यात आलेल्या खोलीकरणात ग्रामस्थांनी श्रमदान करून दगडी बांध पिचिंग करून उभारला आहे. हा अनोखा उपक्रम पहिल्याच वेळेस उभारला गेल्याने या बंधाऱ्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी मोठया प्रमाणात अडविले जाणार आहे. ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे नदी नाल्यांचे यंत्राच्या सहाय्याने खोलीकरण व श्रमदानातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत निधोना गाव आघाडीवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Web Title: fulambri water problem solved by people