रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी हवेत ५०९ कोटी

रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी हवेत ५०९ कोटी

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था, ९८४ किलोमीटरचे रस्ते व २२३ पूल खचले

लातूर - गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे एक हजार ९८४ किलोमीटरचे रस्ते व २२३ पूल खचले आहेत. याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी पाचशे कोटींची गरज आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाला सादर केला आहे. हे रस्ते व पूल खचल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

यावर्षी चार-पाच वर्षांत सर्वाधिक पाऊस झाला. जिल्ह्याची सरासरी ८०२ मिलिमीटर असताना बाराशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. याचा परिणाम जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व पुलांची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे चार हजार ९६२ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी एक हजार ९८४ किलोमीटर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच २२३ पुलांची दुरवस्था झाली आहे. पुलांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी सहा कोटी ६९ लाख रुपयांची गरज आहे. तर रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी ६२ कोटी लागणार आहेत; पण हे रस्ते व पूल कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ५०९ कोटी रुपयांची गरज आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. रस्ते व पूल खचल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहेत. बहुतांश ठिकाणी तारेवरची कसरत करत वाहनधारकांना वाहन चालवावे लागत आहे. जिल्ह्यातील ७७ रस्त्यांची तर तातडीने दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. तसेच ८१ पुलांचे कामही तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. शासन या कामासाठी किती निधी उपलब्ध करून देते याकडे लक्ष लागले आहे. सध्या तरी ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. 

रस्त्यांची व पुलांची झालेली दुरवस्था. त्यासाठी लागणारा निधी 
तालुका    रस्ते दुरुस्तीची    पूल दुरुस्तीची    लागणारा निधी

        किलोमीटरमध्ये लांबी    संख्या    (लाखांत)
लातूर    २९५.३२    २०    ७५०३.१०
औसा    ३२२.१२    ३८    ८२८१.००
रेणापूर    १७८.०१    १७    ४४५२.३०
निलंगा    २५५.३९    २७    ६५४६.७०
शिरूर अनंतपाळ    ८५.६४    २४    २२८५.००
देवणी    १४६.४०    १५    ३७५०.००
जळकोट    ९३.३२    १५    २४२३.००
उदगीर    २५७.३६    २२    ६५६६.००
अहमदपूर    १८६.८८    २७    ४८३४.००
चाकूर    १६४.४०    १८    ४२१७.९०
एकूण    १९८४.८४    २२३    ५०९५९.००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com