जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

  • बीड जिल्ह्यातील परमेश्‍वर जाधवर यांना अखेरचा निरोप 
  • राजस्थानात युद्ध सरावादरम्यान आले वीरमरण 
  • अख्खे घागरवाडा गाव शोकाकुल 

बीड - राजस्थानात युद्ध सरावादरम्यान धारूर तालुक्‍यातील घागरवाडा येथील परमेश्‍वर बालासाहेब जाधवर यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव गुरुवारी (ता. 21) त्यांचे मूळ गाव घागरवाडा येथे आणण्यात आले. जाधवर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, धारूरचे नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, आमदार प्रकाश सोळुंके, तहसीलदार एस. व्ही. शेडोळकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, पोलिस निरीक्षक विश्वास नाईकवाडे, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्‍वर स्वामी, गटविकास अधिकारी सोपान अकेल, सहायक पोलिस निरीक्षक श्री. पालवे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शासकीय, माध्यम क्षेत्रातील व्यक्तींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. 

Image may contain: 3 people, people standing, crowd and outdoor

या वेळी आर्मड एसीसी अँड स्कूल अहमदनगर येथील गार्ड ऑफ ऑनर सुभेदार सतनारायण, सुभेदार जी. एस. शेखावत यांच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली.तत्पूर्वी, शहीद परमेश्‍वर जाधवर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्ययात्रेसाठी धारूर तालुका आणि परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले.

BEED NEWS

समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. शहीद परमेश्वर जाधवर यांच्यामागे पत्नी, दीड वर्षाची मुलगी विद्या, आई-वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral in the Govt