प्रा. अविनाश डोळस यांच्यावर अंत्यसंस्कार

प्रा. अविनाश डोळस यांच्यावर अंत्यसंस्कार

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी (ता 11) सकाळी सहा वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर छावणी स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नंदनवन कॉलनी, संघमित्रा पार्क येथील विदीशा निवास्थान येथे रविवारी दिवसभर आप्तेष्ट व चळवळीतील कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. साडेचारच्या सुमारास निघालेली अंत्ययात्रा साडेपाचच्या सुमारास छावणी स्मशानभूमीत पोचली. तेथे मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अग्निडाग प्रा. डोळस यांच्या पत्नी जॅक्लिन डोळस यांनी दिला. मंगळवारी (ता 13) सायंकाळी पाच वाजता सरस्वती भुवन येथे श्रद्धांजली सभा होणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्रो कुलगुरू अशोक तेजनकर, आमदार इम्तियाज जलील, सुभाष झाबड, मधुकर मुळे, डॉ. गफ्फार कादरी, राजू शिंदे, प्रा. जयदेव डोळे, देवीदास तुळजापूरकर, रमेश भाई खंडागळे, गंगाधर इंदिसे, एच एम देसरडा, दिलीप बडे, रतनकुमार पांडगळे, के. ओ. गीऱ्हे, सुभाष लोमटे, प्रा. संभाजी वाघमारे, शांतीलाल गायकवाड, प्रा. गणेश चंदनशिवे, प्राचार्य एम. ए. वाहुळ, डॉ प्रकाश शिरसाट, गौतम खरात, प्रा. ऋषिकेश कांबळे, किशोर कछवाह प्राचार्य प्रताप बोराडे, ऍड. अंकुशराव भालेकर, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत सोनवणे, डॉ वैशाली उणे लोखंडे,  पंकज भारसाखळे, प्राचार्य अभिजित वाडेकर, अण्णा खंदारे, चंद्रभान पारखे, सिद्धार्थ मोकळे, बाबा गाढे, मंगल खिवंसरा, अमित भुईगळ, प्रतिभा अहिरे, मिलिंद पाटील, दिवाकर कुलकर्णी, प्राचार्य सर्जेराव ठोंबरे, प्रा. दिलीप महालिंगे, भीमराव सरोदे, अरुण शिरसाट, बी एच गायकवाड, डॉ. मनोहर वाकळे, ऍड संजय भिंगारदेव, रावसाहेब साळवे, के. व्ही. मोरे, अभिजित पंडित, विजय वाहूळ, मिलिंद वाघमारे, देवेन करवडे, शांताराम पंदेरे, भरत दाभाडे, बी व्ही जोंधळे, प्रा एल व्ही वाघमारे, रामभाऊ पेरकर, प्रताप कोचुरे, अशोक कांबळे, संजय जगताप, शंकर अंभोरे, राजू पगारे, रमेश जोगदंड, दामुअण्णा कांबळे, चंद्रसेनाबाई शेजवळ, माणिक साळवे, गणेश लोखंडे, नामदेव जोगदंड, प्रा वामन जगताप, यशवंत भंडारे, बाळू गायकवाड, डॉ. अण्णा म्हस्के, किशोर साळवे, वाल्मिक सरोदे, मिलिंद बनसोडे, वसंत जोगदंड, अभय टाकसाळ, शांतीलाल गायकवाड, कृष्णा बनकर, महेबुब भाई, किशोर थोरात, ल बा रहिमाने, श्रीराम पवार, भारत म्हस्के, जनार्धन म्हस्के यांच्यासह राज्यभरातून साहित्य, नाट्य, आंबेडकरी चळवळीतील मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com