कचऱ्याच्या दुर्गंधीने शहराचे बेहाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

औरंगाबाद - शहरातील विकासकामांसाठी पैसा नाही, असे रडगाणे नेहमीच गाणाऱ्या महापालिकेला शासनाने कचराकोंडी फोडण्यासाठी तब्बल ९१ कोटींचा निधी मंजूर केला. घनकचऱ्याचा डीपीआर मंजूर होऊन दोन महिने उलटले असले तरी या निधीतून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी साध्या मशीनची खरेदी महापालिका अद्याप करू शकली नाही. त्यात आता पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर पडून व प्रक्रिया केंद्रावर असलेल्या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, परिसरातील नागरिकांचे बेहाल सुरू आहेत.

शहरात निर्माण झालेली कचराकोंडी देशभर गाजली. नारेगाव परिसरात वर्षानुवर्षे कचऱ्यावर प्रक्रिया न करणारी महापालिका या कचराकोंडीनंतर तरी धडा घेईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. मात्र त्यावर महापालिकेने पाणी फेरले आहे. गेल्या तीन महिन्यांत कचऱ्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. मात्र अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. 
महापालिकेकडे पैसा नसल्याने शासनाने दोन महिन्यांपूर्वी घनकचऱ्याचा डीपीआर मंजूर करून ९१ कोटींचा निधी जाहीर केला. त्यातून प्रत्येक वॉर्डासाठी तीन अशा २७ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात होता.

नागरिकांनी ओळखला होता धोका 
शहर परिसरातील नागरिकांनी ‘तुम्ही पुन्हा आमचे नारेगाव कराल,’ अशी भीती व्यक्त करत विरोध केला होता. त्यावेळी महापालिका मशीन खरेदी करून कचऱ्यावर प्रक्रिया करणार, असे सांगण्यात आले. मात्र तीन महिने उलटले असले तरी महापालिकेचे प्रक्रिया केंद्र अद्याप कागदावरच आहेत. 

Web Title: gabage pollution in city