खासदार गायकवाड अखेर विमानाने दिल्लीला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

उमरगा - एअर इंडिया व इतर विमान कंपन्यांनी प्रवासबंदी उठविल्यानंतर उस्मानाबादचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड प्रथमच गुरुवारी (ता. 20) सायंकाळी हैदराबाद येथील विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले. 

उमरगा - एअर इंडिया व इतर विमान कंपन्यांनी प्रवासबंदी उठविल्यानंतर उस्मानाबादचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड प्रथमच गुरुवारी (ता. 20) सायंकाळी हैदराबाद येथील विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले. 

पुणे ते दिल्ली विमान प्रवासादरम्यान दिल्लीच्या विमानतळावर खासदार प्रा. गायकवाड यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला होता. त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण देशभर आणि लोकसभेतही गाजले होते. त्यानंतर एअर इंडिया व अन्य कंपन्यांनी त्यांना विमान प्रवासबंदी केली होती. प्रयत्न करूनही त्यांना तिकीट मिळत नव्हते. अखेर अलीकडेच त्यांच्यावरील प्रवासबंदी उठविण्यात आली. त्यानंतर ते प्रथमच आज दुपारी सव्वाचारला "एआय 541' या एअर इंडियाच्या विमानाने हैदराबादहून दिल्लीला रवाना झाले. हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खासदार प्रा. गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

Web Title: Gaikwad finally leaves for Delhi by plane