गणेशजी का स्वागत है! जालन्यात जपला गेला धार्मिक सलोखा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

भोकरदन तालूक्यातील वालसावंगी येथे आज मस्जिदसमोरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करून गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच मिरवणुकीत सहभागी साई कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या मुलांना चॉकलेटचे वाटप मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले. नंतर मस्जिद समोर गणपतिची आरती देखील करण्यात आली. 

वालसावंगी (जि. जालना): भोकरदन तालूक्यातील वालसावंगी येथे आज मस्जिदसमोरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करून गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच मिरवणुकीत सहभागी साई कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या मुलांना चॉकलेटचे वाटप मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले. नंतर मस्जिद समोर गणपतिची आरती देखील करण्यात आली. 

काही महिन्यांपूर्वी गावांतील मूर्ती विटंबना प्रकरणामुळे दोन्ही समाजात मोठा वाद निर्माण होऊन, तणावपूर्ण  वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज मुस्लिम बांधवांनी गणपती मिरवणुकीचे केलेले स्वागत व सत्कारामुळे दोन्ही समाजातील संबंध पूर्वीसारखे घट्ट होण्यास मदत होणार आहे.  तणावपूर्ण वातावरणात गावात शांतता प्रस्थापित केल्याने सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथळकर, उपसरपंच ताराचंद कोथळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव भुते, ग्रामपंचायत सदस्य बाळू आहेर, जुबेर शाह, सलीम शाह, बिट जमादार रमेश शिनकर, किरणकुमार भुते आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री. भागावत म्हणाले, की आज मुस्लिम बांधवांनी गणपती मिरवणुकीचे स्वागत करुन जो सत्कार समारंभ केला यामुळे नक्कीच हिंदू, मुस्लिम एकता अधिक घट्ट होणार असून, हे एकतेचे प्रतिक आहे. तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथळकर म्हणाले की मूर्ती विटंबना प्रकरण एक वाईट स्वप्न होते,असे समजून सर्वांनी विसरून जावे,हिंदू- मुस्लिम बंधुता ज्या प्रमाणे अगोदर होती त्याच प्रमाणे कायम ठेवण्यासाठी यापुढे देखील सर्वांनी एकमेकांना सहकार्य,मदत करणे गरजेचे आहे.

Web Title: Ganesh Visarjan In Jalna esakal news