गुलालाची उधळण अन्‌ ‘पावली’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - छावणीतील गणरायांना परंपरेनुसार अकराव्या दिवशी निरोप दिला जातो. त्यानुसार छावणी गणेश महासंघाच्या गणरायाची सोमवारी सायंकाळी आरती करून सहा वाजता पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. 

मिरवणुकीत पडेगाव, गोलवाडी, मिटमिटा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, लक्ष्मी कॉलनीसह छावणी परिसरातील सुमारे तीस मंडळे सहभागी होती. विविध गणेश मंडळांतर्फे सजीव, निर्जीव देखावे करण्यात आले होते. पतित पावन संघटना, अनिरुध्द क्रीडा मंडळ, सुभाष पेठ गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, उत्कर्ष गणेश मंडळांसमोर पावली आणि ढोल-ताशांची धूम होती. जिल्हा परिषद मुलींच्या शाळेपासून निघालेली मिरवणूक नेहरू चौक, नेहरू पुतळा, दर्जी बाजारमार्गे इंग्लिश होलीक्रॉस शाळेसमोरील विहिरीजवळ विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीत गणेश महासंघाचे अध्यक्ष किशोर कच्छवाह, महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर अशोक सायन्ना यादव, छावणी परिषद उपाध्यक्ष प्रशांत तारगे, नगरसेवक शेख हनीफ, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, माजी नगरसेवक करणसिंग काकस, अनिल जैस्वाल, अश्‍फाक खान, महासंघाचे माजी अध्यक्ष रखमाजी जाधव, देवानंद मदनानी, एम. ए. अझहर, शेख वजीर, पवन पांडे, राजेश कच्छवाह, सुभाष कच्छवाह सहभागी होते.

पुरी-भाजी, पाण्याचे वाटप 
मिरवणूक मार्गावर राजकमल गणेश मंडळाचे कमलनारायण जैस्वाल यांच्या वतीने गणेशभक्तांना पुरी-भाजी, पाण्याचे वाटप करण्यात आले. 

Web Title: Ganeshotsav Ganpati Visarjan