नांदेड : बकऱ्या चोरणारी टोळी नागरीकांच्या तावडीत

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 15 मे 2019

नांदेडमध्ये बकऱ्या चोरणाऱ्या टोळीला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. 

नांदेड : गल्लीतील नागरिकांची नजर चुकवून बकऱ्या चोरणाऱ्या टोळीला नागरिकांनी पकडले. त्यांच्याकडून तीन बकऱ्यांची सुटका करून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी नागरिकांनी चोरट्यांना चांगलाच चोप दिला. ही घटना शिवाजीनगर भागातील ओम हॉटेलच्या मागे मंगळवारी (ता. 24) सायंकाळी घडली. 

भंगार व अन्य साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने ही टोळी पाळीव प्राणी (ज्यात शेळी, मेंढी, कोंबडी) चोरत असत. शिवाजीनगर भागात ही टोळी फिरत असतांना एका ॲटोत तीन बकऱ्या चोरून घेऊन जात असल्याची माहिती काही ॲटो चालक व त्या भागातील नागरिकांना समजली. लगेच त्याानी हॉटेल ओमच्या पाठीमागे बकऱ्या घेऊन जाणारा ॲटो (एमएच 26 - एसी - 353) थांबविला. बकऱ्या कोणाच्या आहेत असे विचारले असता चोरट्यांची बोबडी वळली. लगेच नागरिकांनी टोळीतील दोघांना ताब्यात घेतले. मात्र दोघेजण पसार झाले. त्यांना नागरिकांनी चांगलाच चोप देऊन त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चोरलेल्या बकऱ्या घेऊन आपल्या घरी गेले. या प्रकरणी रहीमखआन बिस्मीलाखान यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माधव विठ्ठल गायकवाड (वय 35) आणि प्रेमसिंग धरमसिंग रामगडीया (वय 18) यांच्यासह चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार दत्तात्र्य काळे हे करीत आहेत.

Web Title: A gang of goats stolen is in police custody in Nanded