केजमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार 

केजमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार 

केज (बीड) - एका विवाहितेवर (वय 27) तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी (ता. 15) रात्री केज तालुक्‍यातील माळेगाव येथे घडली.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, की कळंब येथे राहणारी पीडित महिला काही कामानिमित्त केजला आली होती. परत कळंबला जाण्यासाठी शहरातील शिवाजी चौकात दुपारी साडेतीनच्या सुमारास वाहनाची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात तिच्या ओळखीतील दत्ता बाबासाहेब तोंडे हा कार घेऊन आला. सोबत त्याचा मित्र मधुकर गोरोबा इंगळे व सोबत कारचालक आझीम मुस्ताक फारुख हेही होते. "मी कामानिमित्त कळंबला चाललो आहे. तुला सोडतो,' असे म्हणत दत्ताने तिला वाहनात बसविले. महिलेला माळेगावमध्ये न सोडता कार कळंबऐवजी अंबाजोगाई रस्त्यावर फिरवून माळेगावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर कार उभी करून हे तिघे पुन्हा दारू पिले. रात्रीचे अकरा वाजून गेले, तरी त्यांनी महिलेला सोडले नाही. आरोपी दत्ता तोंडे याने कारमध्ये बसलेल्या महिलेवर सर्वप्रथम बलात्कार केला. नंतर इतर दोघांनीही बलात्कार केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com