गंगाधर पाटील चाभरेकरांनी बांधले शिवबंधन

shiv-s.jpg
shiv-s.jpg

नांदेड : हदगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे निष्ठावंत तथा एडव्होकेट राजीव सातव यांचे खंदे समर्थक तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी मुंबई येथे बुधवारी सकाळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी हदगाव विधानसभेचे शिवसेना उमेदवार आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती. चाभरेकर त्यांच्यासमवेत याच मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भगवानराव पवार पाथरडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हा प्रवेश आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी शुभ मानला जात असून, काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर नेते बाबुराव पाटील कोहळीकर यांनी कंबर कसली असून, विद्यमान आमदार आष्टीकर यांना घेरण्याची त्यांनी तयारी केली आहे. गंगाधर पाटील यांच्या प्रवेशामुळे एडव्होकेट सातव आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. यांचा प्रवेश आमदार आष्टीकर यांना फायद्याचा ठरेल हा येणारा काळ ठरवेल.                   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com