स्कूल बसचालकाची मुलगी बनली मोटार वाहन निरीक्षक

Rajashri-Solake
Rajashri-Solake

गंगापूर - स्कूल बसचालकाची मुलगी राजश्री संजय सोळके हिने मोटार वाहन निरीक्षकपदाच्या परीक्षेत यश मिळवीत वेगळी वाट चोखाळली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकपदाच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. दोन) लागला. यात राजश्रीने यश मिळविले. राजश्रीचे वडील संजय सोळके यांनी नेवासा (जि. नगर) येथील घाडगे पाटील यांच्या शाळेवर बसचालक म्हणून काम करून मुला-मुलींना उच्च शिक्षण दिले. स्वबळावर शहरात मंगल कार्यालयही उभारले. त्यांनी स्वतः वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांची दुसरी मुलगी जयश्री ही राहुरी येथील महाविद्यालयात औषधनिर्माता अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. 

राजश्रीने रघुनाथनगर (ता. गंगापूर) येथील शरद रुरल पब्लिक स्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीला मुलींमध्ये तालुक्‍यातून पहिला येण्याचा मान तिने मिळविला. पुढे औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावी, बारावी केले. कोपरगाव (जि. नगर) येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकी शाखेत प्रावीण्यासह पदवी मिळविली. त्यानंतर कारखान्यात नोकरी न करता स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मोटार वाहन निरीक्षकपदाच्या दोन्ही परीक्षांत यश मिळविले.

वडिलांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, मित्र-मैत्रिणींची मदत, धनंजय कसाले, स्वप्नील बोरसे यांचे मार्गदर्शन यामुळे मला यश मिळाले. मोठे यश मिळविण्यासाठी जिद्द, सातत्य, चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. 
- राजश्री सोळके, गंगापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com