वृक्ष नसतील तर कमी पावसाबरोबरच इतरही गंभीर प्रश्‍न उद्‌भवतील - सयाजी शिंदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

गंगापूर - ‘‘प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर कमी पाऊस पडण्याबरोबरच इतरही अनेक गंभीर समस्या उद्‌भवतील,’’ असे प्रतिपादन प्रसिध्द चित्रपट अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले. 

गंगापूर - ‘‘प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर कमी पाऊस पडण्याबरोबरच इतरही अनेक गंभीर समस्या उद्‌भवतील,’’ असे प्रतिपादन प्रसिध्द चित्रपट अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले. 

एकबुर्जी वाघलगाव (ता. गंगापूर) येथे सयाजी शिंदे, चित्रपट लेखक अरविंद जगताप, ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांच्या हस्ते सुगंधाबाई बनसोड यांच्या स्मरणार्थ शनिवारी (ता. १६) वृक्षारोपण करण्यात आले. सयाजी शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्यांची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. आता प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षांची जोपासना करणे आवश्‍यक आहे.’’ प्रा. रवींद्र बनसोड म्हणाले, ‘‘वृक्षलागवड करून आपण पूर्वजांच्या आठवणी जपल्या पाहिजेत. झाडांची सावली आपल्याला त्यांच्यासारखाच आधार देत असते. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड आवश्‍यक आहे. या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनीच वनक्षेत्र आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

साठ एकर परिसरात वनराई करण्याचे उद्दिष्ट
औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दोन हजार वृक्षांची शनिवारी लागवड केली. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गेल्या महिन्यात येथील देवराईत पंचवीस एकर परिसरात अडीच हजार विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वृक्षलागवड करण्यात आली होती. येथे ७१ प्रजातींची झाडे लावण्यात आली. टप्प्याटप्प्याने संपूर्ण साठ एकर परिसरात वनराई करण्यात येणार आहे. 

Web Title: gangapur marathwada news sayaji shinde talking