गंगापुर तालुका दुष्काळी जाहीर करा ; माजी सभापती जाधव यांची मागणी

बाळासाहेब लोणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मागील वर्षी आलेली बोंडअळीने शेतकर्यांचे आधीच कंबरडे मोडलेले आहे आणि यावर्षी उसनवारी व सावकाराकडून कर्ज घेऊन पिके उभे केले. दुष्काळजाहीर करावा अन्यथा असंख्य शेतकरी घेऊन रस्त्यवर उतरू.

- संतोष जाधव (माजी सभापती, अर्थ व बांधकाम, जिल्हा परिषद औरंगाबाद)

गंगापूर : तालुक्यासह गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके आता उद्धवस्त झालेली आहे. तालुका दुष्काळी जाहीर करा अशी मागणी बुधवारी (ता. आठ) जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने कृषीविभागाच्या मार्फत पिकांची पाहणी करून विनाविलंब पंचनामे करून, तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामधे सरासरी २५% टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडलेला असून शेतकऱ्यांना तात्काळ दुबार पेरणीसाठी मदत देण्यात यावी व तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, सततच्या दुष्काळांमुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी देखील चारा व पाणी विकत आणावा लागत आहे, मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असुन सरकारने पाणीपुरवठ्याचे शासकीय टॅकर सुरूच ठेवून यामध्ये जनावरांसाठी देखील स्वतंत्र टॅकर उपलब्ध करून द्यावे व महाराष्ट्रामध्ये दुष्काळीभागात तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्या, बोंडआळीच्या मदतीची हिवाळी अधिवेशनात घोषणा करून दहा महिने उलटले तरी अद्यापपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नसून त्याचा
अहवाल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, सरकारने मोठ्या अभिमानाने घोषणा केलेल्या फसव्या कर्जमाफीमध्ये बरेच शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करून देखील पैसे मिळाले नाही व काही शेतकऱ्यांना तर अर्धवटच पैसे
मिळाले या सगळ्या संभ्रमामुळे शेतकर्यांना शेतीचे कामधंदा सोडून बॅकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

सरकारने या त्रुटींमधील प्रकरणांची तात्काळ सुनावणी करून शेतकर्यांना न्याय द्यावा, सर्व राष्ट्रीयकृत बॅकांना आदेशीत करावे की शेतकर्यांना तात्काळ व किचकट कागदपत्रे न मागता पिककर्ज वितरित करावे, सध्या बॅका शेतकर्यांना फक्त तारीख पे तारीख देत आहे, यामुळे शेतकर्यांना  रोजीरोटी बुडवून बॅकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. परिणामी या अस्मानी व सुलतानी संकंटामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असुन
तो आता आत्महत्येसारख्या वाईट प्रवृत्तीकडे चालला असुन शासनाने याची वेळीच दखल घेतली नाही  तर शेतकरी संपुर्ण उध्वस्त होईल. त्यामुळे शेतकर्यांना आता सरकारकडून मदतीची गरज निर्माण झाली असुन या व वरील सर्व मागण्या सरकारने तात्काळ मान्य करून शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणीचे निवेदननात करण्यात आली आहे.

Web Title: Gangapur taluka will announce drought demanding