esakal | गंगापूरला रेल्वे मार्गाने जोडणार : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
sakal

बोलून बातमी शोधा

aurnagabad

गंगापूरला रेल्वे मार्गाने जोडणार : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गंगापूर : गंगापूर शहर विकासासाठी अठरा कोटींचा निधी व तालुक्यातून जाणारा औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाने जोडणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. डॉ. कराड यांनी यावेळी आमदार प्रशांत बंब, केंद्रीय किशोर धनायत, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी महापौर बापू घडामोडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकरराव वालतुरे, नगरसेवक प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे, तालुकाध्यक्ष शिवनाथ मालकर, अशोक मंत्री यांची उपस्थिती होती.

आमदार बंब म्हणाले, की डॉ. कराड यांनी जिल्ह्याचे शेतरस्ते तसेच गाव रस्त्यांसाठी औरंगाबाद जिल्हा विशेष म्हणून निधी आणावा. किशोर धनायत यांनी नगरपालिकेच्या क्रीडांगनासाठी व जलतरण तलावासाठी आपल्या भाषणातून निधीची मागणी केली, तसेच रेल्वेच्या कामास गती देऊन लोहमार्ग त्वरित सुरु करावा व गंगापुरचे पोस्ट ऑफिस जुन्या गावातील नवीन गावात स्थलांतरित करावे अशी मागणी केली. प्रास्ताविक जेबी पवार यांनी केले.

loading image
go to top