मराठा क्रांती गनिमी कावा मोर्चाची परळीत तयारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.

परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.

येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल फक्त मोर्चाच्या दिवशी असणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली गेली आहे.मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.शहरात येणाऱ्या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत तसेच.शहरात तीन ठिकाणी वाहनतळाची सोय केलेली आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.कुठलीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीसांनी प केले आहे. या आंदोलनासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक - २,पोलीस उपअधीक्षक -६,पोलीस निरीक्षक- २०,पोलीस उपनिरीक्षक -९०,पोलीस कर्मचारी- ८००,राज्य राखीव पोलीस दल २ तुकड्या(२०० कर्मचारी),आर सी पी प्लाटून ३(७५ कर्मचारी) असा तगडा बंदोबस्त असणार आहे
  मोर्च्याच्या दिवशी परळीतील वातुकीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

गंगाखेड हुन परळी मार्गे अंबाजोगाई जाणारी वाहतुक परळीत न जाता धर्मापूरी टी पॉईंट हुन धर्मापूरी - घटनांदूर - अंबाजोगाई अशी वळवण्यात आली आहे.अंबाजोगाई हुन परळी मार्गे बीड जाणारी व बीड हुन परळी मार्गे अंबाजोगाई ला जाणारी वाहतुक नाथरा फाटा- मांडेखेल -दौनापूर अंबाजोगाई अशी वळवण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होणारे परभणी , नांदेड या भागातील येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था शक्तीकुंज वसाहत परळी वैजनाथ येथे करण्यात आली आहे.

अंबाजोगाई मार्गे येणारी वाहनांची पार्कींग सपना हॉटेल शेजारील मोकळे मैदान,समता नगर रोडवर करण्यात आली आहे.रेणापूर - लातूर या भागातील घाटनांदूर,नंदागौळ या मार्गे येणाऱ्या वाहनांची व्यवस्था चांदापुर रोडवर करण्यात आली आहे.बीड - तेलगाव - सिरसाळा या भागातील वाहनांची पार्कींग रिलायन्स पेट्रोल पंप ते सोनपेठ रोडवर करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganimi kava rally by maratha kranti morcha in parali