कचरा झाकण्यासाठी पडदे लावले कोणी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात त्यांना कचरा दिसू नये म्हणून, किलेअर्क भागात पडदे लावण्यात आले होते. हे पडदे कोणी लावले? याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. याबाबत आयुक्त डॉ. निपुण विनायक अनभिज्ञ असून, महापौरांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (ता. सात) शहरात आले होते. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन झाल्यानंतर ते सुभेदारी विश्रामगृहाकडे जाणार होते. त्यामुळे रस्त्यात किलेअर्क येथे पडून असलेला कचऱ्याचा ढीग त्यांच्या नजरेस पडू नये, म्हणून महापालिकेतर्फे याठिकाणी कपडा बांधण्यात आला होता. हा कपडा कोणी बांधला असा प्रश्‍न केला असता? महापौर नंदकुमार घोडेले यांनी मी आयुक्तांकडे विचारणा केली; मात्र त्यांना काहीच माहीत नाही. त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगितले.

Web Title: garbage issue in aurangabad