कचरा प्रश्‍नावर आयुक्‍तांची चुप्पी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद - गेल्या पंचावन्न दिवसांपासून शहराचा कचरा प्रश्‍न सोडविण्यास अजूनही प्रशासनास पुरसे यश आलेले नाही. दरम्यान, महापालिकेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी याप्रश्‍नी चुप्पी साधली आहे.

शहरातील कचरा प्रश्नामुळे नागरिक त्रस्त असताना मनपा प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत कचरा उचलला जात असल्याचे दाखवीत आहे. मात्र, प्रत्यक्षात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आखण्यात आलेला पंचसूत्री कार्यक्रमही कागदावरच राहिलेला आहे. न्यायालयाकडूनही वारंवार या प्रकरणाचा आढावा घेण्यात येत असल्याने विभागीय आयुक्तांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर केवळ चिंता व्यक्त केली. 

याप्रश्‍नी दोन आठवड्यांपूर्वी समितीच्या झालेल्या बैठकीत डॉ. भापकर यांनी नियोजन करून ठोस आराखडा बनविण्याचे व कचरा प्रकल्पासाठी ठिकाणे निश्‍चित करण्याचे आदेश मनपा प्रशासनास दिले होते. त्यानंतरही ढिम्म प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीवर डॉ. भापकर नाराज आहेत. विशेष म्हणजे राज्य शासनाने भापकरांना याबाबत पुढाकार घेऊन प्रश्‍न सोडविण्याचे आदेश दिलेले आहेत. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भापकरांकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. मात्र, त्यांनी या बैठकांमध्ये दिलेल्या सूचना, आदेश पाळलेच जात नाहीत, हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या बैठका केवळ फार्स ठरत आहेत.

Web Title: garbage issue commissioner