औरंगाबाद शहरातील कचराकोंडी आवाक्‍याबाहेर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी आता महापालिकेच्या आवाक्‍याबाहेर गेली आहे. नागरिकांचा रोष वाढल्यामुळे सध्या पडून असलेल्या सुमारे दहा हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शहरात १६ फेब्रुवारीपासून अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यांत महापालिकेला कचऱ्यावर तोडगा काढता आलेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा एकदा कचऱ्याच्या प्रश्‍नाची तीव्रता वाढली आहे. पावसात भिजलेल्या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे

Web Title: Garbage out of control in aurangabad city