कचऱ्याच्या आगीत महापालिकेचे तेल!

कचऱ्याच्या आगीत महापालिकेचे तेल!

औरंगाबाद - कचऱ्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर असताना महापालिका औरंगाबादकरांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहे. अद्यापही रस्तोरस्ती कचऱ्याचे खच असून कचरा प्रक्रियेसाठी नेण्याऐवजी चक्क उद्यान, गाळ्यांसह सापडेल त्या जागी साठवणूक केली जात आहे. तेथेच कचऱ्याला आगी लावण्याचे कारस्थान काहींकडून होत असल्याने खळबळ माजली आहे.

औरंगाबादेतील कचरा प्रश्‍नाची समस्या अद्यापही राजकारणातील रथी-महारथींना सोडविता आली नाही. महापालिका आयुक्त बदलूनही फारसा उपयोग झाला असे म्हणता येणार नाही. तोडगा म्हणून महापालिकेकडून गोपनीयरीत्या अनेक चुकीच्या क्‍लृप्त्या लढवून त्या अमलात आणल्या जात आहेत. काही नागरिकांचा हलगर्जीपणाही या समस्येत भर घालत असून त्यांच्याकडून आग लावण्याचे सर्रास प्रकार होत आहेत. स्थानिकांनी कचऱ्याला आगी लावल्याच्या मे २०१८ पासून तीनशेपेक्षा अधिक घटना घडल्या. अग्निशामक दलाला आलेल्या कॉल्सनुसार, सहा महिन्यांत २८१ वेळा कचऱ्याला आग लावण्यात आली. पावसाळा असल्याने जुलै व ऑगस्टमध्ये आगीच्या तुरळक घटना घडल्या पण इतर महिन्यातील आकडेवारी गंभीरता दाखवते. महापालिकेकडून नेहरू उद्यानातील पाच गाळ्यांत मोठ्या प्रमाणात कचरा साठवल्याची बाब समोर आली. त्यातून कचऱ्याबाबत महापालिकेच्या नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे. 

येथे लावतात आग
पडेगाव, रेल्वे उड्डाणपूल, राहुलनगर स्मशानभूमी, महापालिका शाळेजवळ, जालना रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलच्या बाजूला, सिल्लेखाना ग्रंथालयाजवळ, राष्ट्रवादी भवनाजवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, टिळकनगरजवळ, जिल्हा परिषद मैदान, अयोध्यानगरी, नेहरू उद्यान, सिडको एन-आठ. 

‘सकाळ’चे आहेत हे प्रश्‍न
 कचरा संकलन सुरू आहे, मग रस्त्यावर खच का?
 कचऱ्यावर प्रक्रिया सुरू, मग गाळ्यांमध्ये का 
साठवला जातो?
 कचरा जाळणारांवर तातडीने कडक कारवाई का नाही?
 कोण जाळतेय कचरा, महापालिकेचेच कर्मचारी पेटवतात का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com