पोलिस बंदोबस्ताअभावी थांबली कचऱ्याची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - पडेगाव येथे कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध कायम आहे. तरीही पोलिस बंदोबस्तामध्ये कचरा टाकला जात होता. मात्र, बुधवारी (ता. एक) पोलिस बंदोबस्ताअभावी कचऱ्याचे ट्रक दिवसभर महापालिकेत उभे होते.

महापालिकेने कचरा प्रक्रियेसाठी पडेगाव परिसरात कत्तलखान्याशेजारी जागा निश्‍चित केली आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. मात्र, हा कचरा ओला व सुका असा मिक्‍स असून, त्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पडेगाव परिसरातील नागरिकांनी महापालिकेविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

यापूर्वीच्या कत्तलखान्यामुळे नागरिक त्रस्त असताना आता कचरा प्रक्रिया केंद्रही पडेगावात का? असा प्रश्‍न करीत नागरिक कचऱ्याचे ट्रक अडवून धरत आहेत. या केंद्राकडे जाणार रस्ता अडवून धरला जात असल्याने महापालिकेने पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही नागरिकांचा विरोध मावळलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा लोखंडे यांचे दीर गणेश लोखंडे यांच्यासह काही नागरिकांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली.

त्यानंतर नागरिक अधिकच संतप्त झाले. असे असले तरी महापालिका या ठिकाणी रोज आठ ते १० ट्रक कचरा नेऊन टाकत आहे. मात्र, बुधवारी मात्र महापालिकेला पोलिस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे कचऱ्याचे ट्रक पडेगावात जाऊ शकले नाहीत.

चिकलठाण्यातही विरोध 
शहरातील कचरा हा चिकलठाणा येथे टाकला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटली असून, परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कचऱ्याची दुर्गंधी कमी करा किंवा येथे कचरा टाकू नका, असे म्हणत बुधवारी सकाळी काही नागरिकांनी विरोध केला.

Web Title: garbage transport police bandobast