हर्सूलमधून कचऱ्याचा ट्रक पाठविला परत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

औरंगाबाद - शंभरी पार केल्यानंतरही कचऱ्याला विरोध कायम असून, सोमवारी (ता. २८) पुन्हा एकदा हर्सूल येथून कचऱ्याने भरलेला ट्रक परत पाठविण्यात आला. आतापर्यंत टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करा, त्यानंतरच इथे कचरा आणा, असा इशारा नगरसेवक पूनम बमने यांनी या वेळी दिला. 

औरंगाबाद - शंभरी पार केल्यानंतरही कचऱ्याला विरोध कायम असून, सोमवारी (ता. २८) पुन्हा एकदा हर्सूल येथून कचऱ्याने भरलेला ट्रक परत पाठविण्यात आला. आतापर्यंत टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करा, त्यानंतरच इथे कचरा आणा, असा इशारा नगरसेवक पूनम बमने यांनी या वेळी दिला. 

शहरातील कचराकोंडीने शंभरी पार केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. जुन्या शहरात रस्त्यावर पडलेला कचरा चार ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी टाकण्याचा निर्णय विभागीय समितीने घेतला होता. या ठिकाणीच ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, या ठिकाणी दररोज कचऱ्याचे ढीग वाढत असताना त्यावर प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हर्सूल केंद्रावर रोज मिक्‍स कचरा टाकला जात आहे. त्याला विरोध करत नागरिक, नगरसेवक वाहने पिटाळून लावत आहेत. सोमवारी पुन्हा वर्गीकरण केलेला ओला कचरा घेऊन एक हायवा येथे आणण्यात आला होता. मात्र श्री. बमने यांनी अगोदर साचून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करा, त्यानंतरच येथे वर्गीकरण केलेला कचरा आणण्याचे सांगत गाडी परत पाठविली.

मशीन खरेदी लांबणीवर 
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २७ मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. १९ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार होत्या; मात्र संपूर्ण माहिती घेतो, असे सांगत आयुक्तांनी अद्याप या निविदा उघडल्या नाहीत. याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, डीपीआरमध्ये नमूद असलेल्या संपूर्ण कामांची निविदा एकत्र काढावी लागणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: garbage truck return harsul