औरंगाबाद : हडकोमध्ये दिसतात वाघ, सिंह, हरिण, बिबट

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : वाघ, सिंह, हरिण, बिबट आणि अस्वल या वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी आता जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयात जाण्याची गरज शाळकरी मुलांना राहीली नाही. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा, सार्वजनीक उद्यानांमध्ये हे वन्यप्राणी दिसत आहेत. मात्र यात घाबरुन जाण्याचे काही कारण नाही कारण हे वन्यप्राणी फायबरचे आहेत. मुलांना चित्रात प्राणी, फळे दाखवुन शिकवण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष दाखवुन अधिक चांगल्याप्रकारे शिकवता यावे यासाठी शाळांमधून फायबरचे प्राणी, फळे व खेळण्यांना मागणी वाढत असल्याचे फायबर आर्टिस्टनी सांगीतले.

ग्रामीण पोलिस आयुक्‍तालयासमोरुन जाताना रस्त्याच्या कडेला डरकाळी फोडणारे वाघ, सिंह, बिबटांकडे जाणाऱ्यांचे सहज लक्ष जाते. राजू बेरळकर आणि संतोष कोंडके यांनी शाळा, उद्याने, हॉटेल्स आणि दिवाणखाण्यात वन्यप्राणी ठेवण्याची शहरवासियांना सवय लावली आहे. कोंडके फायबर आर्ट व सुपरस्टार फायबर आर्टमध्ये त्यांनी फायबरचे सिंह, वाघ, हत्ती, मगर, हरिण, अस्वल, कोल्हा, जिराफ, डॉल्फिन मासा याशिवाय लहान मुलांच्या आवडीची मालिकेतील पात्र मोटू - पतलू, सिंगम, डोरेमान, सिजुका, मिकी - डोनाल्ड, अव्हेंजर, सुपरमॅन, हल्क, छोटा भीम, परी , चार्ली चॅप्लिन याशिवाय पाहताक्षणी कापून खाण्याचा मोह होईल असे खरबुज, सफरचंद आणि सिताफळ तयार करण्यात आले आहेत.

राजू बेरळकर : 1992 मध्ये आयटीआयमधून मोल्डिंगचा कोर्स केल्यानंतर काही काळ एका फायबर इंडस्ट्रीत काम केलो. नंतर 2008 मध्ये हा व्यवसाय सुरु केला आहे. तीन चार वर्षांपुर्वी असे फायबरचे प्राणी तयार केले होते, मात्र त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही यामुळे काम बंद केले होते. परंतू गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा फायबरचे वन्यप्राणी, फळे तयार करणे सुरु केले असून आता त्याची मागणी वाढली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , भगवान गौतम बुद्ध यांच्या फायबरच्या पुतळ्यांनाही मागणी वाढली आहे.

संतोष कोंडके : माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. फायबर आर्ट अनुभवाने शिकत गेलो. मुलांनी मोबाईलपासून दुर रहावे त्यांना वन्यप्राणी, फळे पाहून अधिक चांगले शिकता यावे या हेतूने या वस्तू तयार करत आहोत. आधी साचा करुन त्यातुन प्राणी, फळे तयार करतो. साचा तयार करण्यापासून ते रंगकाम करुन विक्रीयोग्य होण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागतो. मुंबईजवळच्या खोपोली येथे सार्वजनीक उद्यानात ठेवण्यासाठी भालू, चित्ता , कासव इथून पाठवले आहे. आता लग्नसमारंभातही वेगवेगळ्या मुर्त्या ठेवण्याचा ट्रेन्ड येत आहे. याशिवाय मनोरंजनासाठी हुरडापार्ट्याच्या ठिकाणीही हे प्राणी ठेवण्यासाठी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com