‘त्यांनी’ फुलवली घराच्या छतावर ‘कमळां’ची बाग...

कमळाची बाग
कमळाची बाग

परभणी : तीन वर्षापासून ते पडले आहेत कमळाच्या प्रेमात...घराच्या छतावर त्यांनी फुलवली आहे कमळांच्या फुलांची बाग... परभणी शहरातील नागोबा गल्लीतील रहिवाशी शरद शिवाजीराव अंबेकर यांनी स्वताच्या घराच्या छतावर विविध फुलांची लागवड केली आहे. तीन ते चार वर्षापासून त्यांनी हा छंद जोपासला आहे. केवळ फुलच नाही तर फळं, औषधी वनस्पती देखील त्यांच्या या छतावरील बागेत आहेत. शरद अंबेकरांचे हे काम आता संपूर्ण मराठवाड्यात चर्चीले जात आहे. सोशल मिडियावर त्यांनी कमळ प्रेमींचा समुहच तयार करून या छंदाला दुसऱ्यांपर्यंतही पोहचविले आहे.

परभणी शहरातील सुभाष रोडवरील नागोबा गल्लीतील रहिवाशी शरद अंबेकर यांच्या छंदाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. सुरवातीला इलेक्ट्रानिक्स वस्तूच्या दुरुस्तीचे काम शरद करत असत. घरी बऱ्या पैकी शेती असल्याने त्यांना सुरवातीपासूनच शेती व विविध वृक्षांचा छंद होता. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराच्या छतावरच त्यांनी छोटीशी बाग तयार केली आहे. या बागेत त्यांनी कमळाच्या फुलांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे ते सर्व कमळे विविध रंगाची आहेत. यात बॉललोटस, पांढरा व गुलाबी कमळ, ग्रीन अॅपल, ब्लड रेड, लेडी बिगंली याचा समावेश आहे. त्याच बरोबर वॉटर लिलीमध्ये पनामा पेसिपिक, बेबी रेड, इनोसेन्स व अन्य एकाचा समावेश आहे. कृष्णकमळ व ऑफीस टाईम नावाच्या फुलांचे झाड देखील त्यांच्या बागेची शोभा वाढवितात. त्याच बरोबर विविध फळाची झाडे देखील आहेत. यात स्विट लेमन, अॅपल बोर, अंजीर, कागदी लिंबू, गावरानी शेवगा व हायब्रीड शेवगा यांचा समावेश आहे.

कमळ प्रेमींचा ‘फेसबुक व व्हॉटसअप’ ग्रुप
विशेष म्हणजे त्यांनी या फुल व फळ झाड्याच्या लागवडीसाठी काळ्या माती ऐवजी कंपोस्ट खत वापरले आहे. किचन वेस्टपासून हे कंपोस्ट खत तयार केले आहे. शरद अंबेकर यांनी कमळ प्रेमी नागरीकांचा ‘फेसबुक व व्हॉटसअप’ ग्रुपही केला आहे. या ग्रुपमध्ये आतापर्यंत मराठवाड्यातील तीन हजार ५०० सदस्य झाले आहेत. 

बियाणे दिले जातील
मला लहानपनापासूनच फुलझांडाची आवड होती. त्यात कमळ मला जास्त आवडते. त्यामुळे ही बाग विकसित केली. ज्यांना कुणाला माझ्या बागेतील फुलांचे व फळ झाडाचे बियाणे मी मोफत देतो. कंपोस्टखत देखील मी स्वता घरीच तयार करतो, असे कमळ प्रेमी शरद अंबेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com