गॅस सिलिंडरच्या स्फोटात शेतकऱ्याचा संसार उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - पिसादेवी येथे एका शेतकऱ्याच्या पत्र्याचे शेड असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली. घरात कुणीच नसल्याने प्राणहानी टळली; मात्र संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता. १८) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. 

अशोक काकासाहेब काळे (वय २९, रा. पिसादेवी) पत्नी व दोन मुलांसह राहतात. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. बुधवारी अक्षयतृतीया असल्याने दुपारी जेवणासाठी ते नातेवाइकांकडे गेले होते. यादरम्यान त्यांच्या घरात गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घाबरले. स्फोटानंतर आग लागली. धुरळा पाहून नागरिकांनी घराकडे धाव घेतली. पाण्याचा टॅंकर बोलावून आग कशीबशी विझविली. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णत: जळाले; तसेच घरातील काही पैसे व दागिन्यांचेही नुकसान झाले. घटनेची माहिती समजताच अशोक काळे हादरले असून, अस्मानी संकटाला तोंड देता देता नाकीनऊ येत असतानाच स्फोटामुळे ते उघड्यावर आले आहेत.

Web Title: Gas Cylinder Blast in aurangabad