मराठवाड्यातील पहिली गॅस पाइपलाइन शेंद्रामध्ये

Gas-Pipeline
Gas-Pipeline

औरंगाबाद - सिलिंडरने गॅस घेण्याचा काळ आगामी वर्षांमध्ये संपण्याची चिन्हे आहेत. शेंद्रा येथे पहिली गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या एका बैठकीत या प्रकल्पासाठी एक एकर जागा देण्याची तयारी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडने दर्शवली आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये येणाऱ्या कारखान्यांना लागणारा गॅस सिलिंडरमधून न देता त्यांच्यासाठी विशेष पाइपलाइन टाकण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वेल्डिंगसाठी गॅसची गरज मोठ्या प्रमाणावर असल्याने उद्योगांना येथे आल्यावर कामासाठी गॅसची कमतरता भासू नये, यासाठी गॅसलाइनने पुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी लागणारी यंत्रणा सुरवातीला शेंद्रा, तर नंतर बिडकीनमध्ये उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी बैठकींचा सिलसिला गेल्या आठवड्यात पार पडला. यामध्ये भारत गॅस रिसोर्स लिमिटेड या भारत पेट्रोलियमच्या अखत्यारीतील कंपनीने हे काम करण्याचे ठरवले आहे. येथे गॅस साठवण्याची आणि त्याचा पुरवठा करण्यासाठीची यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने एक एकर जागा हवी असल्याचे सांगितले होते. त्याला मान्यता देत औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडच्या कारभाऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील पहिली गॅसलाइन ही शेंद्रा येथील ‘ऑरिक’मध्ये होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com