गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

वडनेर - औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन्यजीव विभागाच्या वतीने कन्नड-नागद रस्त्यावरील हिवरखेडा (गौताळा) माहिती केंद्राजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता 24 तास या प्रवेशद्वारावर सीसीटीव्हीची नजर राहील. सुरक्षिततेच्या दृष्टीने अभयारण्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यासाठी नाक्‍यांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक रत्नाकर नागापूरकर यांनी सांगितले.

अभयारण्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद होणे आवश्‍यक असते. मात्र, बऱ्याचदा हे शक्‍य होत नाही, काही वेळा पर्यटकांच्या वाहनांना शासन नियमाप्रमाणे आकारल्या जाणाऱ्या टॅक्‍स पावतीवरून कर्मचाऱ्यांसोबत वादही होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता सीसीटीव्हीमुळे या सर्वांना आळा बसणार आहे.

Web Title: gautala forest entrance CCTV Camera