लग्न लावा परंतू घरच्या घरीच...! कोण म्हणाले वाचा...

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 8 July 2020

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी,  मंगलकार्यालय व लॉन्सवर बंदी कायम

परभणी : कोरोना विषाणु संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये विवाह समारंभ व मंगल कार्यालयावर बंदी घालण्यात आली होती. परंतू आता जिल्हाधिकाऱ्यांनी परत लग्न करा परंतू घरातल्या घरातच असे म्हणत लग्ण सोहळ्याला मुभा दिली आहे. परंतू मंगल कार्यालय व लॉन्सवर मात्र बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच या सोहळ्यासाठी केवळ १५ वऱ्हाडींनाच लग्नात सहभागी होता येणार आहे. त्या पैक्षा जास्त जमल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक उपया योजना केल्या आहेत. मार्च महिण्यानंतर लग्न सराईचा मोसम असल्याने या लग्न समारंभावर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बंधणे आनत सर्व समारंभ रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय बंद
करण्याचे आदेश देऊन त्यांना नोटीसा ही पाठविण्यात आल्या होत्या. या नंतरही 'चोरी चोरी, छुपके छुपके' पध्दतीने ग्रामीण भागात लग्न समारंभ झाले. परंतू त्यानंतर लग्न समारंभाला मुभा देत केवळ पाच व्यक्तीच्या उपस्थितीतीच लग्न लावण्याची परवानगी देण्यात आली.  त्यानंतर आता राज्य शासनाच्या मार्गदर्शन सुचनानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता. सहा) रात्री लग्न समारंभासाठी मुभा बहाल केली आहे. असे करत असतांना मात्र त्यांनी अटी व शर्थी देखील लावल्या आहेत. या अटी शर्तीचे पालन लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या वधु व वर पित्यांना करावे लागणार आहे.

हेही वाचा -  नवीन अध्यासन व संशोधन केंद्र महापुरुषांच्या नावाने होणार, कुठे? ते वाचाच

अश्या आहेत अटी व शर्थी

- मंगल कार्यालय, खुले लॉन्स,सभागृहास बंदी
- घरच्या घऱीच 15 लोकांच्या उपस्थितीत लावा विवाह
- लग्नास उपस्थित राहणाऱ्यांची द्यावी लागणार यादी
- उपस्थितांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही आवश्यक
- त्यात कुणी बाधित आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रॅकींगचा खर्च आय़ोजकाच्या माथी
- १५ पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्यास होणार गुन्हे दाखल

सर्वांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व ई पासही बंधनकारक

परजिल्ह्यातून केवळ पाच व्यक्तीलाच परवानगी पर जिल्ह्यातून लग्न समारंभासाठी परभणी जिल्ह्यात येणाऱ्या वधु किंवा वरासह त्याचे आई- वडील यांच्यासोबत केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी या सर्वांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व ई पासही बंधनकारक असणार आहे.

नियमबाह्य लग्न समारंभ साजरा केल्यास कारवाई 

परभणी महापालिका हद्दीत सक्षम अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी पी.एच. बोंबे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर संबंधित तहसिलदार यांची सक्षम
अधिकारी म्हणून नियुक्ती कऱण्यात आली आहे. कुणीही आदेशाचे उल्लंघन नियमबाह्य लग्न समारंभ साजरा केल्यास कारवाई केली जाईल.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी