मित्रांचा गोतावळा, भरली आठवणींची शाळा 

तुकाराम शिंदे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

तीर्थपुरीच्या मत्स्योदरी विद्यालयातील वर्गमित्र अकरा वर्षांनंतर स्नेहमिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले. या वर्गमित्रांनी रविवारी (ता. 17) जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

तीर्थपुरी - बदलत्या काळात तरुण व्यवसाय व नोकरीत व्यस्त झाला, परिणामी कधीकाळी जिगरी असलेल्या दोस्तांचाही संपर्क कमी झाला. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पुन्हा संपर्कात येत आहेत. दरम्यान, तीर्थपुरीच्या मत्स्योदरी विद्यालयातील वर्गमित्र अकरा वर्षांनंतर स्नेहमिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले. या वर्गमित्रांनी रविवारी (ता. 17) जुन्या आठवणींना उजाळा दिला. 


जुन्या दोस्ताची गळाभेट घेताना.

अनेकांना एकमेकांचा विसर
येथील मत्स्योदरी विद्यालयातील वर्ष 2008 या वर्षातील दहावीचे विद्यार्थी ठिकठिकाणी विविध व्यवसाय; तसेच नोकरी करीत आहेत. बदलत्या काळानुसार प्रत्येकजण व्यस्त झाला. अनेकांना एकमेकांचा विसर पडला होता. दहावी सोडल्यानंतर अनेकांची भेटही झाली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात येऊ लागल्याने यातूनच स्नेहमिलन या कार्यक्रमाचे नियोजन केले.  


आठवणीत रमलेले माजी विद्यार्थी. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र 
दहावी सोडल्यानंतर हे तरुण खासगी व्यवसाय, ठिकाठाणी नोकरी यामध्ये व्यस्त झाले होते. अनेकांचे संपर्क नव्हते; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण एकत्र आले . गेल्या पंधरा दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आले.

हेही वाचा : बेघरांना मिळतोय "आपुलकीचा' सहारा 

जुन्या आठवणींना उजाळा 
तब्बल अकरा वर्षांनंतर हे तरुण एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून या स्नेहमिलन कार्यक्रमात वर्ष 2008 च्या दहावी वर्गातील 90 वर्गमित्र एकत्र आले. या कार्यक्रमात या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कार्यक्रमात शिक्षकांना आवर्जून बोलावून त्याचा सन्मान करून, या कार्यक्रमात प्रत्येकाने प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केली.

हेही वाचा : गहाण जमिनी सावकाराच्या नावावर 

अकरा वर्षांनंतर एकत्र
तब्बल अकरा वर्षांनंतर एकत्र आल्याने वेगळाच आनंद या तरुणांच्या चेहऱ्यावर दिसून आला. या कार्यक्रमाला शिक्षक राम हुलमुख, रमेश पडघम, अमोल शिनगारे, वर्गमित्र अजय अंधारे, कल्याण पठाडे, जयराज तेलगड, विकास साबळे, पंकज मोटे, भागवत बोबडे, उमेश शिंदे, जगदीश सवने, मोहन आरबड, सतीश निकरट, विक्रम पटेकर, रामेश्वर कोकाटे, अविनाश शिंदे, अविनाश खंडागळे, किशोर शिंदे आदी वर्गमित्र उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: get together of old friends